अमोल सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने लॉकडाऊन लागू केला. जिल्हाबंदी अधिक कडक करीत वाहन तपासणी नाक्यावर पोलीस यंत्रणा तैनात केली. आष्टी, साहूर, वरूड या राष्ट्रीय महामार्गावर द्रुगवाडा तपासणी नाका उभारण्यात आला. वर्धा व अमरावती जिल्ह्याची सीमा बंद करण्यात आली. येथे कार्यरत पोलीस उपनिरीक्षक व आठ पोलीस शिपाई पावणेदोन महिन्यांपासून २४ तास सेवा देत आहे. त्यांच्या मुक्कामासाठी उभारण्यात आलेली झोपडी त्यांचे निवासस्थान ठरली आहे.द्रुगवाडा तपासणी नाक्याला लागून वर्धा नदी वाहते. या ठिकाणाहून वरूड, मुलताई, बैतुल मार्गे मध्यप्रदेशला जाणारे २,६४० मोठे ट्रक, १,०५० मिनीगाड्या, ६३९ चारचाकी कार, ३,५०० मोटरसायकलची तपासणी करून त्यांच्या नोंदी केल्या. याच ठिकाणी दोन दारूसाठा असलेली वाहने जप्त केली. या तपासणी नाक्यावर कार्यरत पोलीस उपनिरीक्षक देविदास ठमके यांनी या काळात एकही दिवस रजा घेतली नाही. त्यांचा ६ मे रोजी विवाह ठरला होता. मात्र, त्यांनी सेवेला प्राधान्य देत विवाह पुढे ढकलला. त्यांच्या कार्याचा पोलीस विभागाने गौरव केला आहे.या तपासणी नाक्यावर आर्वीचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र खेडेकर, कर्मचारी आकाश सोनवने, शुभम राऊत, संतोष ईघारे, सूरज शुक्ला, अतुल टेकाम, सूरज सयाम, मयूर बांबल, अतुल काकडे हे पोलीस सेवेत आहे.प्रत्येकी बारा तासाची एक शिफ्ट अशा दोन शिफ्ट विभागून देण्यात आल्या आहे. आष्टीचे ठाणेदार जितेंद्र चांदे यांनी द्रुगवाडा तपासणी नाक्याच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे. या नाक्याला नुकतीच जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी भेट देत पोलीस उपनिरीक्षक ठमके यांचे कौतुक केले.कोरोना युद्ध जिंकण्यासाठी लग्न सद्यस्थितीत पुढे ढकलणे हाच पर्याय होता. मी सामान्य कुटुंबातून पोलीस विभागात दाखल झालो. म्हणून कुटूंबापेक्षा आधी कर्तव्य माझ्यासाठी मोलाचे आहे.- देविदास ठमके, पोलीस उपनिरीक्षक, आष्टी (शहीद).
योद्धांकरिता ‘ती’ झोपडीच ठरली निवासस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:00 IST
द्रुगवाडा तपासणी नाक्याला लागून वर्धा नदी वाहते. या ठिकाणाहून वरूड, मुलताई, बैतुल मार्गे मध्यप्रदेशला जाणारे २,६४० मोठे ट्रक, १,०५० मिनीगाड्या, ६३९ चारचाकी कार, ३,५०० मोटरसायकलची तपासणी करून त्यांच्या नोंदी केल्या. याच ठिकाणी दोन दारूसाठा असलेली वाहने जप्त केली. या तपासणी नाक्यावर कार्यरत पोलीस उपनिरीक्षक देविदास ठमके यांनी या काळात एकही दिवस रजा घेतली नाही.
योद्धांकरिता ‘ती’ झोपडीच ठरली निवासस्थान
ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गावरील द्रुगवाडा तपासणी नाका : पोलीस उपनिरीक्षकाने विवाह ढकलला पुढे