शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

चण्याच्या खरेदीला गोदामाची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 23:39 IST

शासनाने चण्याची खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात कार्यवाही सुरू आहे. सध्या जिल्ह्याची शेतमाल खरेदी यंत्रणा तूर खरेदीत व्यस्त आहे. या तूर खरेदीतच जिल्ह्यातील गोदाम फुल्ल झाल्याने खरेदी केलेला चणा कुठे ठेवावा, असा प्रश्न पणन महासंघाला पडला आहे.

ठळक मुद्देशासकीय वेअरहाऊस फुल्ल : शेतकऱ्यांची तूर बाजार समितीच्या आवारातच

ऑनलाईन लोकमतवर्धा : शासनाने चण्याची खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात कार्यवाही सुरू आहे. सध्या जिल्ह्याची शेतमाल खरेदी यंत्रणा तूर खरेदीत व्यस्त आहे. या तूर खरेदीतच जिल्ह्यातील गोदाम फुल्ल झाल्याने खरेदी केलेला चणा कुठे ठेवावा, असा प्रश्न पणन महासंघाला पडला आहे. यामुळे जिल्ह्यात दिलेल्या मुदतीत चण्याची खरेदी सुरू होईल अथवा नाही या बाबत संशय निर्माण झाला आहे.जिल्ह्यात रबी हंगामात चण्याचे पीक घेणारे शेतकरी अनेक आहेत. या शेतकऱ्यांकडून आता त्यांचे चण्याचे पीक काढण्याचे काम सुरू झाले आहे. आर्थिक अडचणीमुळे काढलेला चणा घरी ठेवण्याऐवजी शेतकऱ्यांकडून तो बाजारात विक्रीकरिता आणल्या जात आहे. शेतकºयाचा शेतमाल बाजारात येताच भाव पडण्याचा प्रकार याही हंगामात होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे शेतकºयांना किमान हमीभाव मिळावा याकरिता शासकीय खरेदीकडे त्यांच्या नजरा आहेत. शासनाने खरेदीच्या सूचना दिल्या. यानुसार खरेदी सुरू करणे अनिवार्य आहे. मात्र गोदामात जागा नसल्याने खरेदी केलेला चणा कुठे ठेवावा असा प्रश्न जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्यांना पडला आहे. नाफेडच्या मार्फत खरेदी होणारी तूर आणि इतर शेतमाल ठेवण्याकरिता जिल्ह्यात दोन गोदाम आहेत. यातील एक एमआयडीसी तर दुसरे बोरगाव (मेघे) परिसरात आहे. या दोन्ही गोदामात सध्या तूर आहे. आतापर्यंत खरेदी झालेल्या तुरीमुळे गोदाम फुल्ल आहे. यामुळे बरीच तूर बाजार समितीत पडून आहे. यात आता चणा खरेदी सुरू करण्याच्या सूचना आहेत. यानुसार कार्यवाही केल्यास खरेदी झालेला चणा कुठे ठेवावा असा प्रश्न खरेदी यंत्रणेला पडला आहे.बाजारातून शेतमाल नेण्याकरिता वाहतुकीचीही अडचणखरेदी झालेला धान्यसाठा गोदामात पोहोचविण्याकरिता वाहतुकीची व्यवस्था असणे अनिवार्य आहे. तशी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र स्थानिक पातळीवर या वाहतुकदारांची देयके अदा करण्यात आली नसल्याने त्यांच्याकडून धान्यसाठा गोदामात पोहोचविण्याकरिता टाळाटाळ होत असल्याची माहिती आहे. यामुळे खरेदी झालेला शेतमाल बाजार समितीतच पडून आहे.या वाहतुकदारांकडून देण्यात आलेले दर शासनाच्या दरापेक्षा अधिक असल्याने ही अडचण निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. धान्य वाहतुकीकरिता दोन किमी अंतराकरिता ६९ रुपये किमी दर ठरविले आहे. या उलट खासगी वाहतुकदारांकडून १२० रुपये किमीचे दर लावले जात आहे. याचा परिणाम येथे पडत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे ही अडचण आणखीच तीव्र होत असल्याचे बोलले जात आहे.हिंगणघाट, समुद्रपूर आणि वर्धा तालुक्यात वाहतुकीची अडचण अधिक असल्याची माहिती आहे. तर कारंजा (घाडगे) येथे अंतराची समस्या या कामात आडकाठी ठरत आहे.शेतमाल गोदामात गेल्याशिवाय चुकारे नाहीशेतकºयांचा शेतमाल खरेदी झाल्यानंतर त्याची जोपर्यंत शासनाच्या वेअर हाऊसच्या खात्यावर नोंद होत नाही तोपर्यंत शेतकºयाचे चुकारे मिळत नाही. सध्या गोदामात जागा नसल्याने शेतकºयांची अडचण वाढत असून चुकाºयांकरिता प्रतीक्षा करावी लागत आहे.