शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
4
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
5
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
6
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
7
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
8
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
9
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
10
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
11
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
12
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
13
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
14
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
15
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
16
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
17
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
18
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
19
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
20
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

कोसळधारेने वर्धामाई वाहतेय ओसंडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST

देऊरवाडा-कौंडण्यपूर येथे मोठया प्रमाणात वर्धा नदीचे बॅकवॉटर जमा होते. यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . वर्धा नदीवरील आर्वी ते अमरावती मार्गावरील वाहतूक पुरामुळे ठप्प झाली आहे. संततधार अशीच कायम राहिल्यास आणखी काही दिवस वाहतूक ठप्प राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देआर्वी-अमरावती मार्ग बंद । अप्पर वर्धाच्या ३३ दारांतून पाण्याचा विसर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : कोसळधारेमुळे वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील देऊरवाडा-कौंडण्यपूर पुलावरून वर्धा नदीचे पाणी दुथडी भरून वाहत आहे. याकरिता आर्वी-अमरावती मार्ग बंद करण्यात आला असून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.आर्वी परिसरात मागील ३६ तासांपासून संततधार सुरू आहे. वर्धा नदीच्या वरील बाजूला अप्पर वर्धा धरण (नलदमयंती) तर खालील बाजूस निम्न वर्धा धरण (बगाजी सागर) धरण आहे. अप्पर वर्धा धरणात संचयित झालेले पाणी वर्धा नदीपात्रात सोडले जाते. सध्या अप्पर वर्धाच्या तेरा दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर आर्वी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणातून ३३ दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहेदेऊरवाडा-कौंडण्यपूर येथे मोठया प्रमाणात वर्धा नदीचे बॅकवॉटर जमा होते. यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . वर्धा नदीवरील आर्वी ते अमरावती मार्गावरील वाहतूक पुरामुळे ठप्प झाली आहे. संततधार अशीच कायम राहिल्यास आणखी काही दिवस वाहतूक ठप्प राहणार असल्याचे सांगितले जात आहे.नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारानिम्न वर्धा धरणाची पूर्ण दारे उघडण्यात आली असून या ३१ दारातून १.३ मीटर एकूण सिसर्ग घन मीटर प्रतिसेकंद ३ हजार ४६६ क्युसेक्स पाणी वर्धा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी निम्न वर्धा धरणाच्या ३१ दारांतून ३० सेंटीमीटरने पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. वर्धा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने वर्धा नदी काठावरील धनोडी बहाद्दरपूर, वडगाव (पांडे), दिघी (होणाडे) सायखेडा, देऊरवाडा आदी एकूण २३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती निम्न वर्धा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता पवन पांढरे धनोडी यांनी दिली.बोरचे तीन दरवाजे ३० सेंमीने उघडलेसेलू -सध्या बोरधरण ९०.८१ टक्के भरले आहे. धरणातून शनिवारी दुपारी ४ वाजता ३ दरवाजे ३० सेंमी उघडून ६६ क्युसेक्स पाणी बोर नदीपात्रात सोडण्यात आले. नदीकाठावरील गावांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या आठवड्यात दुसऱ्यांदा पाणी सोडण्याची वेळ आली आहे. बोरधरणाचा एकूण जलसाठा १२३.२१२ दलघमी आहे. शनिवारी पाणी पातळी ३१९.५२ मीटर व साठा १११.८८३५ दलघमी असा साठा ९०.८१ टक्के आहे. धरणाचे परिचलन आराखड्यानुसार बोर प्रकल्पातून ३ दरवाजे ३० सेंमीने उघडून त्यामधून ६६ क्युसेक पाणी बोरनदीपात्रात सोडण्यात आले. पातळीत वाढ झाल्याने कितीही वेळा धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्यात येऊ शकते, असे उपविभागीय अभियंता भालेराव यांनी म्हटले असून सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहनही केले आहे.

टॅग्स :Wardha Riverवर्धा नदीfloodपूर