शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नदीपात्राला कोरड; डोहानेही गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 22:26 IST

वाढत्या तापमानामुळे तसेच जानवारीपासून निम्न वर्धा धरणाचे पाणी सोडले नसल्यामुळे अंदोरी येथील वर्धा नदीचे पात्र कोरडे झाले आहे. सोबतच पाण्याच्या डोहातील पाणी पातळीही ५० फुटापर्यंत खाली गेल्याने देवळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत ठणठणाट आहे.

ठळक मुद्देपाणीपुरवठा योजना अडचणीत : पालिकेच्यावतीने नदी खोलीकरणाला गती

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : वाढत्या तापमानामुळे तसेच जानवारीपासून निम्न वर्धा धरणाचे पाणी सोडले नसल्यामुळे अंदोरी येथील वर्धा नदीचे पात्र कोरडे झाले आहे. सोबतच पाण्याच्या डोहातील पाणी पातळीही ५० फुटापर्यंत खाली गेल्याने देवळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत ठणठणाट आहे. त्यामुळे देवळी शहराचा पाणीपुरवठा प्रभावित होण्याची शक्यता बळावली आहे.देवळी शहराला अंदोरी येथील वर्धानदीवरुन पाणीपुरवठा केल्या जातो. पण, नदी कोरडी झाल्याने शहरातील पाणी समस्या लक्षात घेताच नगरपालिकेने नदीपात्रातील डोहाचे खोलीकरण सुरु केले आहे. देवळीकरांच्या घशाला कोरड पडण्यापूर्वीच पाण्याची सोय करण्याकरिता जेसीबी व मजुरांच्या सहाय्याने कामाला गती दिली आहे. डोह असलेल्या भागात खोलीकरण करून यातील पाणी एका नालीव्दारे पालिकेच्या जलकुंभापर्यंत पोहोचविले जात आहे. एप्रिलमहिन्यातच ही भयावह स्थिती असल्याने मे महिन्यात याही पेक्षा पाण्याची भिषणता जानवणार आहेत. त्यामुळे वेळीच धोका ओळखून पालिकेने खोलीकरणाकरिता धडपड चालविली आहे. नगरपालिकेचे उपाध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती प्रा. नरेंद्र मदनकर यांच्या देखरेखीत गेल्या दोन दिवसांपासून खोलीकरण केले जात आहे. मागील काही वर्षाचे तुलनेत यावर्षी देवळी तालुक्यातील गावात पाणी टंचाईची भिषणता मोठ्या प्रमाणात आवासून उभी ठाकली आहे. विहिरीही अखेरच्या घटका मोजत असल्याने गावातील नळ योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. ग्रामीण भागातील पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्याकरिता पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषदेसह जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही उपाययोजना हाती घेण्यात आल्या.पात्रातील जलकुंभ पडला उघडाशहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी ३५ कोटी रुपये खर्चुन नविन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. अंदोरीच्या वर्धा नदीपात्रात असेलेल्या डोहाचे पाणी पालिकेच्या जलकुंभात साठवून शहराला पाणीपुरवठा केल्या जात आहे. पण पाण्याचे वाढते बाष्पीभवन आणि निम्न वर्धा जलाशयातून पाणी न सोडल्यामुळे या नदीपात्रातील पाण्याची धार बंद झाली आहे. सध्या नदीपात्रात मातीचा व वाळूचा गाळ साचलेला दिसून येतो. वाहते पाणी नसल्याने नदीतील डोह उघडा पडून आटण्याची शक्यता बळावली आहे. पालिकेच्या पाणीपुरवठ्याचे जलकुंभ याआधी नदी पात्राच्या पाण्यात बुडलेला राहायचा. मात्र सद्यस्थितीत हा जलकुंभ घडला पडला आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई