शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात बापूंनी नाकारलेल्या अतिरेकी विकासालाच मिळतेय चालना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 11:55 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त सेवाग्राम विकास आराखड्यातील विकास कामांना पूर्णत्वास नेण्याच्या खटाटोपात त्यांच्या काळात लावलेली शेकडो अजस्त्र वृक्ष धाराशाही केली जात आहे.

ठळक मुद्देगांधीवादी, पर्यावरणपे्रमींमध्ये रोष सेवाग्राम आराखड्यातील कामात शेकडो वृक्षांचा बळी

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अतिरेकी विकासाला नाकारून वृक्षांचे संवर्धन आणि संगोपन करण्याला प्राधान्य दिले होते. मात्र, त्यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त सेवाग्राम विकास आराखड्यातील विकास कामांना पूर्णत्वास नेण्याच्या खटाटोपात त्यांच्या काळात लावलेली शेकडो अजस्त्र वृक्ष धाराशाही केली जात आहे. त्यामुळे बापूंना नको असलेला निसर्ग ‘भकास’ करणारा ‘विकास’ चक्क गांधीभूमीतच होत असल्याने गांधीविचारक व पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत.

महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त सेवाग्राम विकास आराखड्यातील विकासकामांना गती दिली जात आहे. या आराखड्यांतर्गत दत्तपूर-वर्धा-सेवाग्राम या मार्गाचे चौपदीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामाकरिता आतापर्यंत ७० वृक्ष तोडण्यात आले असून १७० वृक्ष तोडण्याची तयारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आली आहे. वर्धा ते सेवाग्राम या मार्गालगत लावलेले बहुतांश वृक्ष हे राष्ट्रपिता महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी यांच्या काळातील आहेत. जवळपास ७५ ते ८० वर्षांपासून वर्धेकरांना शुद्ध हवा आणि सावली देणाऱ्या या वृक्षांचे आता विकासाच्या झंझावातात सरपण होत आहे. वृक्षांची होणारी ही कत्तल गांधीविचार, पर्यावरणप्रेमी व वर्धेकरांना असहनीय असल्याने त्यांनी याला विरोध दर्शवून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. वृक्षांच्या संवर्धनासाठी गांधीभूमीतील आंदोलनाची धग आता समाजमाध्यमांद्वारे देशपातळीवरही पोहोचली आहे.सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत दत्तपूर ते सेवाग्राम या जवळपास १२ किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गांतर्गत ३ हजार वृक्ष येतात पण, ते रस्त्यामध्ये येऊन अपघातास कारण ठरण्याची शक्यता आहे, असे १७० वृक्ष तोडावे लागणार आहेत. आता पर्यावरणप्रेमींच्या भावनांचा विचार करून फेरसर्वेक्षण सुरू केले आहे. यापैकी किती वृक्ष वाचविता येतील, याची माहिती घेतली जात आहे. सोबतच तोडलेल्या वृक्षांच्या तुलनेत जास्त वृक्ष लावले जाणार आहेत.

- गजानन टाके, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धा.

ज्या महात्मा गांधींनी वृक्षांचे संवर्धन करण्याला प्राधान्य दिले, त्याच महात्म्याचा १५० वा जयंती महोत्सव वृक्षांची कत्तल करून साजरा करण्यात येत आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे. विकासाला आमचा विरोध नाही, पण तो वृक्षतोड करून, पर्यावरणाला हानी पोहोचविणारा नसावा. याबाबत तात्काळ काय तो निर्णय घ्यावा, अन्यथा चिपको आंदोलन केले जाईल.- संजय इंगळे तिगावकर, बहार नेचर फाउंडेशन,वर्धा.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीSewagramसेवाग्राम