शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कदम रुग्णालयात १० दिवसांत ७० सोनोग्राफी; आर्वीतील प्रकरणात धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 09:56 IST

सोनोग्राफी सेंटरमध्ये १ जानेवारी ते १० जानेवारीदरम्यान तब्बल ७० सोनोग्राफी करण्यात आल्याची माहिती असून यापैकी अंदाजे ४४ सोनोग्राफींच्या फॉर्मवर पेशंटच्या स्वाक्षऱ्या नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. 

- चैतन्य जोशी/राजेश साेळंकीवर्धा/देऊरवाडा (आर्वी) : आर्वी येथील गर्भपात प्रकरणात आता नवनवे खुलासे होत असतानाच डॉ. रेखा कदम आणि डॉ. नीरज कदम चालवित असलेल्या सोनोग्राफी सेंटरमध्ये १ जानेवारी ते १० जानेवारीदरम्यान तब्बल ७० सोनोग्राफी करण्यात आल्याची माहिती असून यापैकी अंदाजे ४४ सोनोग्राफींच्या फॉर्मवर पेशंटच्या स्वाक्षऱ्या नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. आर्वी येथील गर्भपात प्रकरणाकडे राज्याचे लक्ष लागले असताना आरोग्य विभागालाच प्रकरणाचे गांभीर्य समजले नसल्याचे दिसते. पीसीपीएनडीटी कमिटीने ४८ तासांत चौकशी अहवाल न्यायालयात सादर करणे आवश्यक असतानाही तब्बल ११ दिवसांनी अहवाल सादर करण्यात आला. कदम सोनोग्राफी सेंटरमध्ये १ ते १० जानेवारी दरम्यान ७० सोनोग्राफी झाल्या मात्र, यातील अनेक सोनोग्राफी फॉर्मवर पेशंटची आणि डॉक्टरांची स्वाक्षरी आढळून आली नाही. तसेच सोनोग्राफीचे कारणही नमूद केले नसल्याचे आढळले. एफ फॉर्ममध्येही अनेक त्रुटी आढळल्या. मात्र, अजूनही आरोग्य विभागाकडून हवी तशी कारवाई केली जात नसल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.आरोग्य संचालकांनी केली कदम हॉस्पिटलची पाहणीशुक्रवारी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी आर्वी गाठून कदम हॉस्पिटलची पाहणी करून अवैध गर्भपाताचे गांभीर्य जाणून घेतले. डॉ. पाटील यांनी त्यांच्या आर्वी दौऱ्यादरम्यान आर्वी उपजिल्हा रुग्णालयात अधिकाऱ्यांशी बैठक घेत आतापर्यंत झालेल्या चौकशीची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी नागपूर विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, आर्वी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे यांची उपस्थिती होती.परिचारिकांचा जामीन फेटाळला डॉ. रेखा कदम हिला सहकार्य करणाऱ्या परिचारिका संगीता गळे आणि पूजा दहाट यांनाही पोलिसांनी अटक केली होती. त्या न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांनी विशेष जिल्हा व सत्र पॉक्सो न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने दोन्ही परिचारिकांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.