शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील वर्धिनींचे सव्वाचार कोटींचे मानधन थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 15:15 IST

एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत जगायचे कसे, असा यक्षप्रश्न वर्धिनींपुढे उभा ठाकला आहे.

ठळक मुद्दे१ हजार ८६ महिलांची उपासमारउमेद अभियानांतर्गत महिलांच्या उत्थानासाठी कार्य

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उमेद अभियानांतर्गत काम करणाऱ्या जिल्ह्यातील १ हजार ८६ वर्धिनींचे तब्बल ४ कोटी २१ लाख ६१ हजार ६२१ रुपयांचे शासनाकडे थकले आहेत. महिलांच्या उत्थानासाठी कर्तव्य बजावणाऱ्या वर्धिनींना मानधन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत महिलांच्या विकास व उत्थानासाठी विविध उपक्रम राबविले जातात. उमेद अभियानाअंतर्गत वर्धिनीमार्फत गरीब व गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो. यामध्ये घटस्फोटित, विधवा व परितक्त्यांचादेखील समावेश आहे.वर्धिनींना या कामाचा मोबदला म्हणून ठराविक मानधन दिले जाते. जिल्ह्यामध्ये २०११-१२ पासून या वर्धिनी आपले कर्तव्य बजावत आहेत. नोव्हेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० पर्यंत जिल्ह्यातील १ हजार ८६ वर्धिनींना मानधन मिळाले नाही.त्याच्या मानधनापोटी ४ कोटी २१ लाख ६१ हजार ६२१ रुपये शासनाकडे थकीत असल्याने आता मानधनाविना उदनिर्वाह कसा करावा, हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.

वर्धिनींनी आमदारांना घातले साकडेस्थानिक अधिकाऱ्यांकडून तोडगा निघत नसल्याने वर्धिनींनी आमदार डॉ. पंकज भोयर यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपली कैफियत मांडली. आमदार भोयर यांनी तातडीने दखल घेत महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांना पत्र पाठविले. तसेच याबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी सत्यजीत बढे, उमेदच्या जिल्हा समन्वयक स्वाती वानखेडे यांच्याशी शुक्रवारी चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती सरस्वती मडावी, वैशाली नोहाटे, मनीषा आसरकर, माधुरी निधेकर, रूपाली अंबुलकर, वंदना थूल, अर्चना ताकसांडे, वनिता वैद्य, पूजा भगत, वनिता पाटील, राजू मडावी, आशिष कुचेवार उपस्थित होते.

राज्यातील २२ जिल्ह्यात बजावले कर्तव्यजिल्ह्यातील कनिष्ठ व वरिष्ठ वर्धिनींनी २०११-२०१२ पासून राज्यातील नागपूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, धुळे, नाशिक, ठाणे, पालघर, औरंगाबाद, अहमदनगरसह २२ जिल्ह्यांत सामाजिक समावेशन संस्था बांधणी व क्षमता बांधणीचे काम केले आहे.यामध्ये कनिष्ठ वर्धिनींच्या १२० चमूमध्ये ७८६ तर वरिष्ठ वर्धिनींच्या १०० चमूमध्ये ३०० महिलांचा समावेश होता. चार महिन्यांचे मानधन शासनाकडे थकीत असल्याने संबंधित विभागाकडे सतत पाठपुरावा केला. मात्र, त्यांच्या थकीत मानधनाबाबत कोणताच निर्णय झाला नाही.शासनाकडून अनुदान प्राप्त न झाल्याने मानधन रखडले आहे, असे स्थानिक अधिकाऱ्यांकडून मौखिकरीत्या सांगितले जात आहे. एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत जगायचे कसे, असा यक्षप्रश्न वर्धिनींपुढे उभा ठाकला आहे.

टॅग्स :Governmentसरकार