शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Wardha; बालाघाटला निघालेल्या ३४ कामगारांना वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थांबवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 19:20 IST

आर्वी येथील कोरोना उपाय योजनांची पाहणी करून येत असताना ३४ कामगार बालाघाट येथे जाण्यासाठी पायी निघाल्याचे जिल्हाधिकारी यांना दिसताच त्यांनी कामगारांना समजावून सांगितले व रोखून धरले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा:- आर्वी येथील कोरोना उपाय योजनांची पाहणी करून येत असताना ३४ कामगार बालाघाट येथे जाण्यासाठी पायी निघाल्याचे जिल्हाधिकारी यांना दिसताच त्यांनी कामगारांना समजावून सांगितले व रोखून धरले. तसेच उमरी मेघे येथे त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली.उमरी मेघे येथील हर्षनील अ‍ॅग्रो इंडस्ट्री आहे. येथे ३४ कामगार काम करतात. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे त्यांना घरी जायचे होते. हे कामगार भर उन्हात आज बालाघाटकडे पायी प्रवासाला निघाले होते. जिल्हाधिकारी आर्वीचा दौरा आटोपून परत येत असताना त्यांना उमरी मेघे येथे हे मजूर भरदुपारी पायी जाताना दिसले. त्यांनी लगेच गाडी थांबवून मजुरांची विचारपूस केली. 300 किलोमीटरचा पायी प्रवास करणे अवघड आहे. देशात लॉक डाऊन असल्यामुळे खाण्या पिण्याचे आणि राहण्याची सोय रस्त्यात कुठेही होणार नाही. रस्त्यात तुम्ही आजारी पडलात तर दवाखाने कुठे शोधणार. आम्ही तुमची पूर्ण व्यवस्था करू. हे सर्व संपले की तुम्ही तुमच्या गावाकडे जाऊ शकता. तुम्ही संगीत वाजवा, गाणे म्हणा, खेळा तुम्हाला हवं ते करा आम्ही तुमची सर्व व्यवस्था करतो असे समजावून सांगितल्यावर मजूर थांबायला तयार झाले.वर्धा तहसीलदार प्रीती डुडुलकर, नायब तहसीलदार शकुंतला पाराजे यांनी सदर ठिकाणी भेट देऊन मालकाशी चर्चा केली. ते पगार द्यायला तयार असूनही कामगारांना त्यांच्या गावी जायचे होते. अशा परिस्थितीत एवढा प्रवास करून जाणे धोकादायक असल्याचे त्यांना समजावून सांगितले आणि तिथेच थांबविण्यात आले. उमरी मेघे येथे त्यांची राहण्याची व्यवस्था आहे. तसेच प्रशासनाने त्यांना शिधासुद्धा उपलब्ध करून दिला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस