शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदीच्या वर्धा जिल्ह्यात १६९१ मद्यपींना मिळाली सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 14:06 IST

दारू बंदी असतानाही वर्धा जिल्ह्यात माजी सैनिक वगळता मागील वर्षभरात तब्बल १ हजार ६९१ सर्वसामान्य नागरिकांना दारू पिण्याचा तसेच दारूसाठा बाळगण्याचा अधिकृत परवाना देण्यात आला आहे.

ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क विभागाचे परवाना वाटप

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात कित्येक वर्षांपासून दारूबंदी आहे; पण ठिकठिकाणी खुलेआम देशी-विदेशीसह गावठी दारूविक्रीचा व्यवसाय राजरोसपणे चालत असल्याचे वास्तव आहे. या दारूविक्रीच्या अवैध व्यवसायामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. बंदी असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने माजी सैनिक वगळता मागील वर्षभरात मार्च अखेरपर्यंत तब्बल १ हजार ६९१ सर्वसामान्य नागरिकांना दारू पिण्याबाबतचा तसेच दारूसाठा बाळगण्याचा अधिकृत परवाना देण्यात आला आहे. यामुळे सदर मद्यपींना बंदीच्या जिल्ह्यात दारू पिण्यासह बाळगण्याची सुट मिळाल्याचेच दिसते.दारूबंदी जिल्ह्यात दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. त्यांच्याकडून वेळोवेळी दारूविक्रेत्यांवर कारवाईही केली जाते; पण पोलीस विभागाच्या तुलनेत राज्य उत्पादन शुल्क विभाग कारवाई करण्याच्या संदर्भात नेहमीच मागे राहत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. माजी सैनिकांसह इतर सर्वसामान्य नागरिकांना वर्षभरासाठी दारू पिण्याचा तसेच दारूसाठा बाळगण्याचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने देण्यात येतो. यंदाच्या वर्षी मार्च अखेरपर्यंत एकूण १ हजार ८०८ व्यक्तींना सदर परवाने देण्यात आले आहेत. यात ११६ माजी सैनिकांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

अपुऱ्या मनुष्यबळामुळे होते दमछाकराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वर्धा कार्यालयाचा गाडा प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर ओढला जात आहे. सद्यस्थितीत या कार्यालयात एकही स्थायी अधिकारी नसल्याचे बोलले जात असून अपूऱ्या मनुष्यबळामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांची विविध कामे पूर्णत्वास नेताना चांगलीच दमछाक होते. परिणामी, वर्धा जिल्ह्यात दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वरिष्ठांकडून तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची गरज व्यक्त होत आहे.

स्मार्ट कार्डनंतर माजी सैनिकांनी फिरविली पाठराज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने देण्यात येणारा परवाना माजी सैनिकांसह दारूसाठा बाळगणाऱ्यांनी प्राप्त करणे क्रमप्राप्त आहे. दिवसेंदिवस माजी सैनिक सदर परवाना प्राप्त करण्याकडे पाठ फिरवित असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. सर्वसामान्यच मोठ्या प्रमाणात सदर परवाना प्राप्त करीत आहेत. २०१५-१६ मध्ये माजी सैनिकांसाठी स्मार्ट कार्ड आल्यानंतर सदर प्रक्रिया किचकट वाटत असल्याने अनेक माजी सैनिक नोंदणी करण्याकडे दुर्लक्षच करीत असल्याचे दिसते.

वैद्यकीय अहवालावर मिळतो परवानाराज्यात वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे; पण माजी सैनिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे दारूगोळा भंडार असल्याने आणि त्याच परिसरात दारूविक्रीचे दुकान असल्याने वैद्यकीय अहवालाचा आधार घेत दारू पिण्याचा तसेच दारूसाठा बाळगण्याचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.वर्षभरात १.६९ लाखांचा महसूलदारू बाळगण्याचा तसेच पिण्याच्या परवान्यासाठी आवेदन करणाऱ्यांकडून प्रत्येकी १०० रुपये शासकीय शुल्क म्हणून घेतले जातात. या शुल्कात माजी सैनिकांना सुट देण्यात आली असून यंदाच्या वर्षी मार्च अखेरपर्यंत १ लाख ६९ हजार १९० रुपयांचा महसूल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वर्धा कार्यालयाला प्राप्त झालेला आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी