शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

प्रभावी उपाययोजनांमुळेच वर्धा ‘कोरोनामुक्त’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:00 IST

जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्थ असलेल्या यंत्रणेची आहे. सुरुवातीपासूनच विदेश, परजिल्ह्यातून आलेल्या लोकांचे सर्वेक्षण करून माहिती घेण्यात आली. त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क करून लक्षणे असणाऱ्यांची आरोग्य तपासणी केली. यासाठी विशेष पथके नियुक्त केली. जिल्हा व आरोग्य प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना सूचना करण्यात आल्या.

ठळक मुद्देसाथरोग नियंत्रण कक्ष, विशेष पथक, चेकपोस्ट, नियमित सर्वेक्षण, आरोग्य तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा सध्या कोरोनामुक्त आहे. जिल्हा प्रशासनाने सुरुवातीपासून केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळेच वर्धा कायम शून्य राहिला आहे. सीमाबंदी, नियंत्रण कक्ष, विशेष पथके, चेकपोस्ट तपासणी आणि गावपातळीवरील सर्वेक्षणाचा मोठा फायदा झाला. प्रशासनाच्या उपाययोजनांना नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे कोरोना सीमेवरच रोखण्यात यश आले आहे.जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्थ असलेल्या यंत्रणेची आहे. सुरुवातीपासूनच विदेश, परजिल्ह्यातून आलेल्या लोकांचे सर्वेक्षण करून माहिती घेण्यात आली. त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क करून लक्षणे असणाऱ्यांची आरोग्य तपासणी केली. यासाठी विशेष पथके नियुक्त केली. जिल्हा व आरोग्य प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना सूचना करण्यात आल्या. याचे नागरिकांनी पालन केले. चोरमार्गाने येणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हीच कोरोनाला रोखण्यात जमेची बाजू ठरली. सर्व विभागांचे सांघिक प्रयत्न व सहकार्याने वर्धा जिल्हा सद्यस्थितीत कोरोनामुक्त आहे.२४ तास नियंत्रण कक्ष, माहिती अद्ययावत करण्याचे कामजिल्हास्तरावर २४ तास नियंत्रण कक्षाची स्थापन करून जिल्हाधिकारी, व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. लक्षदीप पारेकर, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा खोब्रागडे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. संदीप नखाते, जिल्हा साथरोग तज्ज्ञ डॉ. विनीत झलके, डॉ. अनुजा बारापात्रे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सिद्धार्थ तेलतुंबडे, आरोग्य सहाय्यक जवाहर सेलोकर, मूल्यमापन व सनियंत्रण अधिकारी, नारायण जवादे, डीईओ (आयडीएसपी) यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.या कक्षामार्फत जिल्ह्यातील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचे संपर्क शोधणे, संशयित प्रवासी शोधणे, बाहेरून देशातून आलेले तसेच बाहेर जिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांशी तत्काळ संपर्क साधून लक्षणे आहेत का, याची माहिती घेऊन सर्व माहिती अद्ययावत करण्याचे कार्य नियंत्रण कक्षामार्फत करण्यात आले.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरआधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांची तपासणी करण्यास्तव जिल्ह्यातील प्रत्येक चेकपोस्टवर व प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता थर्मल स्कॅनिंग गन पुरविण्यात आल्या. त्यामार्फत चेकपोस्टवर येणाºया नागरिकांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी दररोज रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच हॅपी हायपोक्सीयाची प्राथमिक लक्षणे शोधून काढण्यास्तव प्रत्येक आरोग्य संस्थेमध्ये पल्स ऑक्झीमीटरद्वारेसुद्धा तपासणी करण्यात येत आहे.सीमेवरील चेकपोस्टवर तपासणीजिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आलेल्या असून सर्व सीमाभागात एकूण १६ ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले. त्या ठिकाणी बाहेर जिल्ह्यातून आलेल्या लोकांची तपासणी करून त्यांची नोंद घेण्यात आली व अशा लोकांना गृहविलगीकरण करण्यात आले. प्रत्येकाची नियमितपणे आरोग्य तपासणी करण्यात आली.मजुरांची तपासणीकामाकरिता वर्धा जिल्ह्यात आलेल्या मजुरांची नोंदणी करून त्यांची समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आर.बी.एस.के व सर्व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत नियमित तपासणी करण्यात आली. विविध ५९ निवाºयांमध्ये असलेल्या आजपर्यंत जवळपास ८४१२ मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांचे विलगीकरण करण्यात आले.खाकीतील कोरोना योद्यांची आरोग्य तपासणीजिल्ह्यातील एकूण १६ चेकपोस्ट वर कार्यरत तसेच संपूर्ण जिल्ह्यामधील कार्यरत पोलीस विभागातील एकूण २२०० कर्मचाºयांची वैद्यकीय तपासणी वैद्यकीय अधिकारी तसेच आयएमएचे डॉक्टरांमार्फत करण्यात आली व समुपदेशन तसेच किरकोळ आजारांवर उपचार करण्यात येत आहे.गावपातळीवर सर्वेक्षणआरोग्य विभागामार्फत प्रत्येक शहर व गांव पातळीवर आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत दैनंदिन प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये एसएआरआय व आयएलआय या सारखी लक्षणे आढळलेल्या रुग्णांची दैनंदिन माहिती घेऊन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. परदेशातून आलेल्या ११४ तसेच परजिल्ह्यातून १९९१० नागरिकांची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन करून लक्षणांबाबत माहिती घेण्यात आली. जिल्ह्यात एकूण ११५३ एवढी पथके तयार करण्यात आलेली असून त्यांची जबाबदारी तालुक्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ. केंद्र यांना सोपविण्यात आलेली आहे.सुरुवातीपासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियोजन केल्यामुळे व नियोजन केल्यामुळे कोरोनाचा सीमेवर रोखण्यात यश आले आहे. हा कोरोना जिल्ह्यात येऊ नये म्हणून प्रशासन तर प्रयत्न करीतच आहे. मात्र, नागरिकांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, घाबरून जाऊ नये, हात स्वच्छ धुणे, सामाजिक अंतर ठेवणे व शासनाने निर्गमित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव यापुढे सुद्धा टाळता येईल. प्रतिबंध हाच उपचार असून सर्व नागरिकांनी आरोग्य प्रशासनाला सहकार्य करावे.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या