शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Wardha Blast; कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे घडली घटना; मृतांची संख्या ६ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 10:31 IST

Wardha Blast: वर्धा जिल्ह्यातील पुलगावात असलेल्या लष्करी तळावर मंगळवारी पहाटे ५.३० च्या सुमारास झालेल्या अपघाती स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता सहावर गेली आहे.

ठळक मुद्देगंभीर जखमींची स्थितीही चिंताजनकआमदार तडस यांनी दिली घटनास्थळाला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: वर्धा जिल्ह्यातील पुलगावात असलेल्या लष्करी तळावर मंगळवारी पहाटे ५.३० च्या सुमारास झालेल्या अपघाती स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता सहावर गेली आहे. वर्धा स्फोटा जखमी झालेल्या ११ जणांपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. जबलपूर येथील दारुगोळा भांडारातील माल येथे निकामी करण्यासाठी आणला होता. कंत्राटदाराकडून हे काम करुन घेतले जात असते व त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली अशी माहिती आहे. 

मृतांमध्ये प्रभाकर वानखेडे, राजकुमार भोवते, विलास पचारे, नारायण पचारे, सर्व रा. सोनेगाव व प्रवीण मुंजेवार रा. केळापूर यांचा समावेश आहे. विकास बेलसरे, संदीप पचारे, अमित भोवते, रूपराव नेताम, मनोज मोरे, तसेच दिलीप निमगड़े रा. केलापुर हे जखमी आहेत.

आमदार तडस यांनी दिली घटनास्थळाला भेटआमदार रामदास तडस यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तसेच दुर्घटनाग्रस्तांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. वर्धा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैने यांनी या अपघाताबाबत तातडीने उपाययोजनेच्या सूचना जारी केल्या आहेत. 

काय आहे घटना?वर्धा जिल्ह्यात पुलगाव येथील देवळी तालुक्यात सोनगावबाई गावाजवळ असलेल्या लष्करी तळावर मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास भीषण स्फोट झाले. बॉम्ब निकामी करताना हातातून पेटी खाली पडल्याने हे स्फोट झाल्याचे समजते. यात आतापर्यंत सहाजण ठार झाले असून ११ जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर सावंगी मेघे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Wardha Blastवर्धा स्फोटBlastस्फोट