शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा-आजनसरा रस्त्याच्या डागडुजीची मागणी

By admin | Updated: January 5, 2017 00:41 IST

वर्धा येथून आजनसरा देवस्थानकडे जाण्याऱ्या डांबरी रस्त्याचे पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून बांधकाम करण्यात आले.

निधा (टाकळी) येथे रस्त्यावर गटार : पंतप्रधान ग्राम सडक योजनेत केले होते रस्त्याचे काम वर्धा : वर्धा येथून आजनसरा देवस्थानकडे जाण्याऱ्या डांबरी रस्त्याचे पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून बांधकाम करण्यात आले. परंतु गत चार-पाच वर्षात या रस्त्याची कोणतीच दुरुस्ती किंवा डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले झाले. या मार्गावरील निधा गावाचे सांडपाणी डांबरी रस्त्यावरून वाहत असल्याने येथे गटार साचले आहे. या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी होत आहे. आजनसरा देवस्थानाकडे जाणारे भाविक अनेकदा या गटार अडखळून पडले आहे. दुचाकीने जाताना अपघात अधिक होतात. तर चारचाकी वाहने खड्ड्यात किंवा चिखलात फसल्याच्या घटना घड्ल्या असून या सांडपाण्याची व्यवस्था लावून या भागातील रस्त्याची तातडीने डागडुजी करण्याची मागणी आहे. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ग्रामपंचायत येथे तक्रार दिली. अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. या स्थळावर अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावरच प्रशासनाला जाग येईल, असे दिसून येते. या प्रकाराबाबत येथील ग्रामस्थ खंत व्यक्त करतात. टाकळी नंतर आजनसरा जवळचा नाल्यावरील पुलाची डागडुजी करण्याची मागणी आहे. पुलाचा परिसर खचलेला आहे. रात्रीच्या वेळी दुचाकीस्वाराला रस्त्याचा अंदाज आला नाही तर खड्ड्यात पडून अपघात होऊ शकतो. याकडे दुर्लक्ष केले जाते. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, आमदार, खासदार यांना निधा येथील ग्रामस्थांनी पुन्हा निवेदन दिले आहे. आजनसरा देवस्थानाकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेकरिता येथील रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी आहे. निधा येथे सांडपाण्यामुळे तयार झालेल्या खड्ड्याची दुरुस्ती संबंधित विभागाने करावी, अशी मागणी भाजपा सांस्कृतिक सेलचे जिल्हा संयोजक डॉ. विजय पर्बत, ग्रामस्थांनी केली आहे. या मार्गाची व खड्ड्यांची डागडुजी पंधरा दिवसांत केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनात देताना श्रावण काचोळे, संतोष ठाकरे, नानाभाऊ जौंजाळ, विनोद जौंजाळ, दिवाकर राऊत, मिलिंद बोंडे, रंजित राऊत, गजानन लिचडे, निलेश झाडे, प्रभाकर पारवडकर, विजय आष्टनकर आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)