शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात ७ रुग्णांची कोरोनावर मात तर जिल्ह्यात ८ कोरोनाबधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 19:10 IST

वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ४४ कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी ५ हजार ९४९ अहवाल प्राप्त झाले आहेत. यात ५ हजार ८६३ निगेटिव्ह तर ५९ पॉझिटिव्ह आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यातील २२ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी गुरुवारी ७ रुग्णबरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. तर नव्याने ८ कोरोना बाधित रुग्ण सापडले असून यामध्ये ४ महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे यात आर्वी २,वर्धा ४ ,कारंजा तालुक्यातील २ रुग्ण आहेत. या रुग्णासहित जिल्ह्यातील रूग्णसंख्या ५९ झाली असून यापैकी २१ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये नालवाडी येथील ५ रुग्ण तसेच वीज वितरण विभागाचे 2 कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यांना दोन दिवस संस्थात्मक विलागलीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. प्रतिबंधित क्षेत्र मोकळे होताच त्यांना घरी सोडण्यात येईल.आज बाधित झालेल्या रुग्णांमध्ये आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका वय ३५ वर्ष आणि अटेंडंट वय ५५ वर्ष, वर्धा शहरातील इतवारा येथील ७२ वर्षीय महिला , हिंद नगर येथील 75 वर्षे पुरुष आणि केशव सिटी येथील ३७ वर्षीय पुरुष आणि महादेवपुरा येथील महिला तसेच कारंजा तालुक्यातील काकडा येथील पती- पत्नी वय अनुक्रमे ३० आणि २० या रुग्णांचा समावेश आहे.यातील दोन रुग्णांना सेवाग्राम येथे तर पाच रुग्णांना सावंगी रुग्णालयात कोरोनावरील उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.महादेवपुरा येथील महिलेचा काल मृत्यू झाला असून त्यांचा अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. त्यांना काल सेवाग्राम येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजारही त्यांना होते. त्यांच्यावर आज कोरोना मार्गदर्शक नियमाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले.जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ४४ कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी ५ हजार ९४९ अहवाल प्राप्त झाले आहेत. यात ५ हजार ८६३ निगेटिव्ह तर ५९ पॉझिटिव्ह आले आहेत. आज १३० स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून 95 अहवाल प्रलंबित आहेत. तसेच आयसोलेशन मध्ये १४३ व्यक्ती आहेत.६२ हजार ५६५ व्यक्तींना आजपर्यंत गृह विलगिकरण करण्यात आले आहे. त्यापैकी ५५११३ व्यक्तींचा गृहवीलगिकरण कालावधी संपला असून ७४५२ व्यक्ती आज गृहवीलगिकरणात आहेत. तसेच संस्थात्मक विलगिकरणात २६८ व्यक्ती आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस