शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

वारकऱ्यांना देव्हाऱ्यातच घ्यावे लागणार ‘माऊली’चे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST

वारकरी संप्रदायाचे हृदयस्थान असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनाची दरवर्षी आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या तीरावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येतात. ऊन्ह, वारा व पावसाची तमा न बाळगता शेकडो किलोमीटरचा पायदळ, सायकल किंवा वाहनाने प्रवास करुन पंढरपूर गाठतात. चंद्रभागेत स्नान करुन विठ्ू माऊलीचे ‘याची देही, याची डोळा’ दर्शन घेत नवी ऊर्जा घेवून परतात.

ठळक मुद्देपंढरपुरच्या वारीत खंड : जिल्ह्यातून जाणाऱ्या दिंड्या व वारी केल्या रद्द

विजय माहुरे।लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या भेटीकरिता दरवर्षी आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या तीरावर भक्तांचा मेळा जमतोय. गावागावातून विठ्ठल नामाचा गजर करीत दिंड्या-पताका, पायदळ वाऱ्या पंढरपुरला एकत्र येतात. या शतकानुशतकाच्या परंपरेला यावर्षी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे खंड पडणार आहेत. सर्व दिंड्या व वारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने वारकऱ्यांना यावर्षी आपल्या देव्हाऱ्यातीलच विठू माऊलीचे दर्शन घ्यावे लागणार आहे.वारकरी संप्रदायाचे हृदयस्थान असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनाची दरवर्षी आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या तीरावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येतात. ऊन्ह, वारा व पावसाची तमा न बाळगता शेकडो किलोमीटरचा पायदळ, सायकल किंवा वाहनाने प्रवास करुन पंढरपूर गाठतात. चंद्रभागेत स्नान करुन विठ्ू माऊलीचे ‘याची देही, याची डोळा’ दर्शन घेत नवी ऊर्जा घेवून परतात.याच दिवशी शेगाव येथून संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, तर उत्तर भारतातून कबिराची पालखी तेथे येत असते. अशा या भव्यदिव्य सोहळ्यावर कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे पहिल्यांदाच विरजण पडले आहे. सर्वत्र कोरोनाचा हाहाकार असल्याने शासनाच्या सूचनांचे पालन करीत राज्यभरातील सर्व दिंड्या व वारी ही रद्द करण्यात आल्या. त्यात वर्धा जिल्ह्यातून जाणाऱ्या वारंकऱ्यांनीही आपला कार्यक्रम रद्द केला आहे. परिणामी यावर्षी आषाढी एकादशीला वारकऱ्यांच्या घरोघरीच विठू नामाचा गजर होणार आहे.विदर्भाच्या पंढरीतील वारकऱ्यांचे लॉकडाऊनविदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया घोराड येथून संत केजाजी महाराज व त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र नामदेव महाराज यांनी पंढरपुरची पायदळ वारी केली. सोबतच विठ्ठल भक्त असेलेले हरिभाऊ रामटेके यांनीही पायदळ वारी केली. दरम्यानच्या काळात पायदळ वारीत खंड पडला तरी घोराडसह पंचक्रोशितील भाविक वाहनांनी वारी करतात. २००४ मध्ये संत केजाजी महाराज यांच्याप्रती श्रद्धा असलेले यवतमाळ जिल्ह्यातील नरेश महाराज पाटील हे घोराडच्या विठ्ठल रुख्माई देवस्थानचे ट्रस्टी बबन महाराज माहूरे यांच्या नेतृत्वात घोराड ते आळंदी बस व रेल्वेचा प्रवास करुन तेथून निघणाऱ्या माऊलीच्या पालखी सोहळ्यात केजाजी महाराज दिंडी म्हणून सहभागी होतात. यामध्ये जवळपास १ हजार ५०० वारकऱ्यांची उपस्थिती असते. गेल्या पाच वर्षांपासून घोराड येथील हरिभाऊ महाकाळकर हे घोराड ते पंढरपूर पायदळ दिंडीचे आयोजन करतात पण, यावर्षी लॉकडाऊनमुळे या वारीमध्ये खंड पडणार आहे.वीस वर्षापासूनची पंरपरा खंडीतदेवळी तालुक्यातील गौळ येथील संत लोटांगण महाराज मंदिराच्यावतीने गेल्या वीस वर्षापासून आषाढी एकादशीला पालखी व दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते. वर्ध्यातील आर्वीनाका परिसरातील ज्ञानेश्वर मंदिरातून निघणाºया दिंडी सोहळ्याला कोरोना आपत्तीमुळे यावर्षी रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रामदास पवार यांनी दिली आहे.कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहे. वारीमध्ये मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची गर्दी असते. आपण सुरक्षित राहून दुसऱ्यांना सुरक्षित ठेवण्यातच धन्यता आहे. त्यातही आषाढी एकादशीला विठू माऊलीचे मंदिर उघडे राहणार की नाही, धार्मिकस्थळे बंद असल्याने पालखी निघणार कशी, असे अनेक प्रश्न आहे. त्यामुळे आजची परिस्थिती पाहता शासनाला सहकार्य करणेच उचित ठरेल.- पुरुषोत्तम गुजरकर, वारकरी, घोराड.

टॅग्स :Pandharpurपंढरपूर