शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

भरकटलेला वाघ देवळी तालुक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 00:21 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील विविध भागात भटकंतीनंतर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील सावंगी (हेटी) शिवारात आलेल्या वाघाने आता देवळी तालुक्याकडे आपला मोर्चा वळविला आहे.

ठळक मुद्देपिंजराबंदचा प्रस्ताव प्रलंबितच : आंबोडा, अलमडोह, काचनगाव, सावंगी (हेटी), वडनेर, होत कोळोणा चोरेत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील विविध भागात भटकंतीनंतर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील सावंगी (हेटी) शिवारात आलेल्या वाघाने आता देवळी तालुक्याकडे आपला मोर्चा वळविला आहे.देवळी तालुक्यातील कोळोणा (चोरे) शिवारात काहींना सदर वाघाचे दर्शन झाले असून त्याने दोन जनावरांचा फडशा पाडला. यामुळे या परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. सदर वाघाने आतापर्यंत कुठल्याही मनुष्यावर हल्ला केला नसला तरी परिसरातील ग्रामस्थांनी सतर्क रहावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे. याच वाघावर यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांनी सुमारे महिनाभर पाळत ठेवली होती. तर वर्धा जिल्ह्यात या वाघाने प्रवेश केल्यापासून वर्धा वन परिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड व त्यांचे सहकारी त्याच्या मागावर आहेत. कुठलीही अनुचित घटना टाळता यावी. शिवाय सदर वाघाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत जाता यावे याकरिता रस्ता मोकळा करून देत नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये याची माहिती सदर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी गावागावात जावून नागरिकांना देत आहेत. सदर वाघ हिंगणघाट तालुक्यातील पोहणा नजीकच्या गावांमधील शेतशिवारामध्ये असताना त्याला पिंजराबंद करण्यासाठीचा विनंती प्रस्ताव मुख्य वनसंरक्षकांकडे पाठविण्यात आला होता. परंतु, त्यावर अद्यापही कुठलाही निर्णय न झाल्याने या वाघाला स्थानिक वन विभागाच्या अधिकाºयांना पिंजराबंदही करता येत नसल्याचे सांगण्यात येते. सुमारे अडीच ते साडेतीन वर्ष वयोगट असलेल्या या वाघामुळे सध्या शेतकºयांसह नागरिकांच्या अडचणीत भर टाकली आहे.आंबोडासह कोळोणा (चोरे) भागात भीती; दोन जनावरांचा पाडला फडशादेवळी : तालुक्यातील आंबोडा व कोळोणा (चोरे) या गावातील दोन जनावरांचा फडशा वाघाने पाडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात वाघाचा मुक्तसंचार होत असल्याच्या विषयाला वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुजोरा दिला जात आहे.सदर वाघाने आंबोडा येथील गुणवंत अजाब मडावी यांच्या शेतात असलेल्या वासराला गतप्राण केले. मडावी यांचे शेत आंबोडा-कानगाव मार्गावर आहे. त्यांनी शेतातील गोठ्यात जनावरे बांधली होती. रात्रीच्या सुमारास वाघाने सदर जनावरांवर हल्ला करून वासराला गतप्राण केल्याने पशुपालक मडावी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी वाघाच्या पावलांचे ठसे आढळून आले असून त्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. तर बुधवारी या वाघाने कोळोणा (चोरे) येथील युवराज पोहेकर यांच्या मालकीच्या रेड्याचा फडशा पाडल्याचे उघडकीस आले आहे. पोहेकर यांचे घर गावाचे शेवटी असून याठिकाणी हे जनावर बांधून होते. तेथे त्याच्यावर हल्ला करून वाघाने ही शिकार भारत भस्मे यांच्या शेताजवळील नाल्याचा आवारात ओढत नेली. दरम्यान दिलीप बोबडे व त्याच्या कडील काही मजूरांना या वाघाचे दर्शन झाल्याने त्यांनी आरडा-ओरड केली. त्यानंतर समस्त ग्रामस्त जागे झाले. दरम्यान वाघानेही गावा शेजारच्या आवारातून पळ काढला. हा वाघ छाव्याच्या शोधात भटकला असावा असा अंदाज वर्तविल्या जात आहे. आंबोडानंतर लगेच दुसºया दिवशी कोळोणा चोरे येथे हा वाघ आढळून आल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे.कानगावात उलट-सुलट चर्चेला उधाणवायगाव (नि.) : कानगाव नजीकच्या आंबोडा गावात वाघाने गाय ठार केल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदगाव येथे ग्रा.पं. प्रशासनाच्यावतीने सतर्कतेबाबत गावात दवंडी देण्यात आली आहे. शेतात एकटे न जाता रात्रीला महिला व पुरुषांसह लहान मुलांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर काही नागरिकांनी वायगाव परिसरात वाघाला बघितल्याची उलट-सुटल चर्चा होत आहे.गाय केली गतप्राणमोझरी (शेकापूर) - परिसरात वाघाने गाय ठार केली. या घटनेमुळे परिसरातील पाच ते सहा गावांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे. नागरिकांनीही सतर्क राहून वाघाला आपल्या नैसर्गिक अधिवासात परत जाऊ द्यावे, असे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात येत आहे. नजीकच्या आंबोडा व भैय्यापूर शिवारामध्ये वाघाने शेतातील गोठ्या बांधून असलेल्या गायवर हल्ला करून तिला ठार केले. परिसरात वाघाचा मुक्तसंचार होत असल्याने वन विभागाच्या अधिकाºयांनी परिसरातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. मोझरी परिसरातील खानगाव, नांदगाव, कोसुर्ला, पोटी, डौलापूर, भैय्यापूरातील ग्रामस्थांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे. वाघाच्या भीतीमुळे शेतीची कामेही ठप्प पडली आहेत.आंबाडा (गिरोली) शिवारात गोºह्याची शिकारचिकणी (जामणी) : हिंगणघाट तालुक्यात भटकंती झाल्यानंतर देवळी तालुक्याकडे वाघाने मोर्चा वळविला आहे. देवळी तालुक्यातील आंबोडा (गिरोली) येथील गुणवंत मडावी यांच्या मालकीच्या गोºह्याची शिकार या वाघाने केल्याने परिसरात कमालीची दहशत निर्माण झाली आहे. या पूर्वी या वाघाने काही पाळीव प्राण्यांची शिकार केली असली तरी आतापर्यंत कुठल्याही मनुष्यावर त्याने हल्ला केलेला नाही. वाघाचा मनुष्यावरील हल्ला टाळता यावा यासाठी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Tigerवाघ