शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वडाळा शिवारात बिबट्याचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:01 IST

नरभक्षी वाघिणीच्या हैदोसामुळे प्रकाशझोतात आलेल्या वडाळा शिवारातील वादळ नुकतेच शमले. आता या शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांनी जंगलात चराईसाठी सोडलेल्या भाकड जनावरांवर हल्ले सुरू केले आहे.

ठळक मुद्देदोन गार्इंचा पाडला फडशा

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : नरभक्षी वाघिणीच्या हैदोसामुळे प्रकाशझोतात आलेल्या वडाळा शिवारातील वादळ नुकतेच शमले. आता या शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांनी जंगलात चराईसाठी सोडलेल्या भाकड जनावरांवर हल्ले सुरू केले आहे. यात त्याने २ गार्इंचा फडशा पाडला. तर ४ गायी बेपत्ता आहेत. त्यामुळे शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे. याप्रकरणी वनाधिकाºयांनी पंचनामा केला आहे.वडाळ्याचे गुराखी धनराज बऱ्हांणपुरे यांनी गावातील सर्व जनावर गायी, म्हशी, गोरे, कालवड चराईसाठी जंगलात नेले. यातील काही भाकड गायी जंगलातच थांबल्याने सुरक्षित असेल अशी खात्री झाली. मात्र काही दिवसातच बिबट्याने दहशत माजविली असून जनावरांवर हल्ले सुरू केले आहे. गोविंद पोटे, रविंद्र वडस्कर, प्रवीण लावणकर, प्रवीण पोटे, पांडुरंग शिथाले यांच्या गाई बिबट्याने शिकार केल्याचे सांगत आहे. सद्या दोन गाई मृत दिसल्या आहे. चार गार्इंचा शोध सुरू आहे.याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी, वनरक्षक एन.वाय. परतेती यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून वरिष्ठांना अहवाल पाठविला आहे. नुकसान भरपाई मंजूर झाल्यावरच देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी जंगलातील अंतर्गत जाणाऱ्या रस्त्यावरुन शेतात जायला हिम्मत करत नाही. त्यामुळे शेतपिकाच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भागातील वनजमिनीवर अनेक शेतकऱ्यांच्या शेत्या आहेत. यामुळे या भागात शेतकऱ्यांची वर्दळ असते. अशात याच परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतक्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमुळे शेतकऱ्यांनी या भागात जाणे टाळल्याने शेतीची कामे खोळंबली आहे.वडाळा शिवारात बिबट आहे. शेतकऱ्यांनी जंगलात मुक्कामी व जनावर ठेवू नये. वनरक्षकांची गस्त लावुन संरक्षण देण्याचे काम सुरू आहे.- अमोल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी आष्टी(श.)