शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कागदपत्रांकरिता उपविभागातील शेतकऱ्यांची पायपीट थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 05:00 IST

सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सरकारी कार्यालये व बँक आदी सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये याची खबरदारी घेण्याबाबत शासनाने व त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनीही विविध आदेश पारित केले आहे. यानुसारच सर्व बॅक व्यवस्थापकांची बैठक घेऊन शेतकऱ्यांची पायपीट व गर्दी टाळण्याकरिता कागदपत्राची पूर्तता करण्याकरिता तांत्रिक पद्धतीचा अवलंब करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ठळक मुद्देउपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश : पीककर्ज घेणाºयांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतीचा हंगाम तोंंडावर आला असताना पीककर्जाकरिता शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. याकरिता आवश्यक असलेले कागदपत्रे मिळविण्याकरिता शेतकरी तहसील, तलाठी कार्यालय तसेच बँकेत गर्दी करण्याची शक्यता आहे. सध्या लॉकडाऊन सुरु असल्याने शेतकऱ्यांची पायपीट थांबविण्यासह गर्दी टाळण्यासाठी उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी वर्ध्यासह आजुबाजुच्या परिसरातील शेतकऱ्यांकरिता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीकरिता पीककर्जासाठी विविध बँकांकडे अर्ज करीत आहे. पीककर्जाकरिता फेरफार पंजीची प्रत, सद्यस्थितीतील सातबारा आदी कागदपत्रांची पूर्तता करावी लागत आहे. ही कागदपत्रे मिळविण्यासाठी शेतकरी तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय व बँकेमध्ये गर्दी करण्याची शक्यता आहे.सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सरकारी कार्यालये व बँक आदी सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये याची खबरदारी घेण्याबाबत शासनाने व त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनीही विविध आदेश पारित केले आहे. यानुसारच सर्व बॅक व्यवस्थापकांची बैठक घेऊन शेतकऱ्यांची पायपीट व गर्दी टाळण्याकरिता कागदपत्राची पूर्तता करण्याकरिता तांत्रिक पद्धतीचा अवलंब करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बँक आणि महसूल विभागच शेतकऱ्यांच्या अर्जानुसार कागदपत्राची उपलब्धता करुन देणार असल्याने शेतकºयांची पायपीट थांबणार आहे.प्रायोगिक तत्त्वावर राबविताहेत उपक्रमबँकेकडे पीककर्जाकरिता शेतकऱ्यांचा अर्ज आल्यावर बँकेने सर्व शेतकऱ्यांच्या शेत सर्व्हे नंबरसहित बॅकनिहाय यादी बनवून तलाठी व तहसील कार्यालयाकडून आवश्यक असलेल्या कागदपत्राच्या सूचीसह बँकेचा पत्ता वर्धा तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक कुणाल गजानन डबरे यांच्या kgdabre25@gmail.com या संकेतस्थळावर DVOT-Surekh या फॉन्टमध्ये पाठवायची आहे. बँकेकडून यादी प्राप्त होताच यादीनिहाय आवश्यक सातबारा व फेरफारपंजी उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे. काही अडचणी असल्यास कनिष्ट लिपिक कुणाल डबरे व नायब तहसीलदार डॉ.एस.आर.पाराजे यांच्याशी संपर्क साधावा. कागदपत्राकरिता शेतकºयाला तहसील किंवा तलाठी कार्यालयात पाठवू नये, असेही बँकाना सूचित करण्यात आले आहे. हाउपक्रम वर्धा उपविभागात प्रायोगित तत्त्वावर राबविला जाणार असून यात यश मिळाल्यावर जिल्ह्याकरिता हा प्रयोग राबविला जाणार आहे.जिल्हाधिकारी साहेबांनी सर्व बँक व्यवस्थापकांची बैठक घेऊन शेतकऱ्यांची पीककर्जाविषयी चर्चा केली. पीककर्जाकरिता फेरफार पंजी व सातबारा आदी कागदपत्राची पूर्तता करण्याकरिता शेतकरी तलाठी किंवा तहसील कार्यालयात गर्दी करण्याची शक्यता आहे. ही गर्दी टाळण्याकरिता बँकांनी आलेल्या अर्जानुसार आवश्यक कागदपत्रांची यादी पाठविल्यास त्यानुसार कागदपत्र उपलब्ध करुन देण्याची योजना पहिल्यांदा वर्धा उपविभागात प्रायोगित तत्त्वावर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यातील यश लक्षात घेऊन इतर उपविभागातही सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल.- सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा

टॅग्स :Farmerशेतकरी