शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पांजरा-बोथली रस्त्याला डागडुजीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 22:13 IST

जंगलव्याप्त भागातील बोथली ते पांजरा या रस्त्याची अत्यंत दैनावस्था झाली आहे. रस्त्यावर डांबराचा थर कुठेच नजरेस पडत नाही.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : गिट्टी उखडली

आॅनलाईन लोकमतरोहणा : जंगलव्याप्त भागातील बोथली ते पांजरा या रस्त्याची अत्यंत दैनावस्था झाली आहे. रस्त्यावर डांबराचा थर कुठेच नजरेस पडत नाही. गिट्टी उखडली असल्याने येथून वाहन चालविणे तर सोडाच पायी चालणे कठीण झाले आहे. आदिवासी बहुल भागाला जोडणाºया या रस्त्याची झालेली दैनावस्था पाहता याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने लक्ष नाही काय, असा प्रश्न उपस्थित होतो.बोथलीसह परिसरातील गावात जाण्यासाठी जंगल परिसर आणि घाटातून जावे लागते. एक किलोमीटर अंतराचा रस्ता वाहन चालविण्या योग्य आहे. मात्र उर्वरीत रस्ता अत्यंत खराब आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याची डागडुजी केलेली नाही. या रस्त्यावरील उखडलेली गिट्टी, ठिकटिकाणी पडलेले खड्डे, रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल नाल्या आणि घाटाचे वळण पाहता वाहन चालकांना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. त्यामुळे हा रस्ता रहदारीकरिता धोकादायक ठरत आहे.पांजरा येथून बोथली पुढे रोहणा येथे हा रस्ता जातो. दररोज शेतकरी, शेतमजुर कामासाठी तर विद्यार्थी शाळेसाठी या रस्त्याने आवागमन करतात. पांजरापासून घाटापर्यंतचा रस्ता बांधण्यात आला आहे. मात्र पांजरा (घाट) ते बोथली हा किलोमीटरचा अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. रस्त्याची डागडुजी का केली नाही असा प्रश्न शेतकरी, शेतमजुर, विद्यार्थी, गावकरी उपस्थित करतात.रस्त्याची गिट्टी उखडली असल्याने येथून वाहने घसरतात. रस्त्याच्या मधोमध खड्डे पडले आहेत. दोन्ही बाजुला खोल दऱ्या आहेत. अशात एखादे वाहन दरीत पडण्याचा धोका आहे. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणे धोकादायक झाले आहे. महाराष्ट्र शासन रस्ते मजबुतीला प्राधान्य देत असताना हा रस्ता अजुनही दुर्लक्षीत असल्याने ग्रामस्थ रोष व्यक्त करतात.प्रवासी त्रस्तया मार्गाने प्रवास करताना सायकलचालक, विद्यार्थी घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्याच्या दैयनीय अवस्थेमुळे वाहन पंक्चर होणे, वाहन घसरणे या घटना नित्याच्याच झाल्या आहे. या भागातील पंचायत समिती सदस्या माया नायसे यांनी रस्ता बांधकामाकरिता आमदार, पालकमंत्री, बांधकाम विभाग, जि.प. प्रशासन यांच्याकडे वारंवार मागणी केली. अद्याप या मागणीकडे लक्ष दिले नसल्याने बोथली व परिसरातील ग्रामस्थांना यातनामय प्रवास करावा लागतो.