शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

दारात बसून प्रशांतची येण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: June 9, 2014 23:47 IST

एक आठवडा झाला १६ वर्षीय प्रशांत परत आला नाही. चंद्रमोळी झोपडीच्या दारात बसून त्याची आई रेणुका डोळ्यातील आसवे गाळीत त्याच्या परत येण्याची एकटक वाद पाहत आहे

डोळे वाटेवर : बेपत्ता मुलाच्या शोधासाठी आईवडिलांची धडपडसेलू : एक आठवडा झाला १६ वर्षीय प्रशांत परत आला नाही. चंद्रमोळी झोपडीच्या दारात बसून त्याची आई रेणुका डोळ्यातील आसवे गाळीत त्याच्या परत येण्याची एकटक वाद पाहत आहे. चिंताग्रस्त उदास चेहर्‍याच्या पत्नीची अवस्था पाहून प्रशांतचे वडील संजय यांच्याही मनाचा तोल सैरभर झाला आहे. आमच्या मुलाचे काही झाले तर नसेल ना? हा केविलावाणा प्रश्न ते येणार्‍या प्रत्येकाला विचारताना त्यांच्या जीवाची कालवाकालव होत आहे.सेलू तालुक्यातील ब्राह्मणी या  छोट्याशा गावात संजय लक्ष्मण नैताम (४0)  आपली पत्नी रेणुका (३५), मुलगा प्रशांत (१६) व लहान मुलगी पुजा(१३) यांच्यासह एका चंद्रमोळी झोपडीत राहतात. प्रशांतचे वडील गावातील अनिल कुंभारे यांच्या शेतावर सालदार म्हणून तर आई शेतावर रोजमजुरीचे काम करतात. बेपत्ता झालेला प्रशांत सेलूच्या दीपचंद विद्यालयातून नुकताच इयत्ता ९ वी पास झाला होता, तर पूजा सेलू येथील यशवंत विद्यालयातील ६ वी उत्तीर्ण झाली. उन्हातान्हात कष्ट उपसून मुला-मुलीला शिकवून मोठं करण्याच त्याचं स्वप्न होत. पण हाल भोगून मुलांची तळहाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेणार्‍या आईवडीलांच्या स्वप्नाला आता निराशेची झळ पोहचत आहे. ३0 मे ला प्रशांत घरुन अचानक बेपत्ता झाला. सेलू पोलीस स्टेशनला तक्रार तो हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली. मुलाच्या शोधात त्यांची अनेक गावे पालथी घातली. अनेक गावात दूरध्वनीवरुन शोधण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांशी संपर्क केला मात्र प्रशांतचा ठावठिकाणा नाही. दोन चिमणी-पाखरांच्या किलबिलाटांनी सदैव गजबजलेल्या चंद्रमोळी झोपडीतील उदासपणा आई-वडिलांना आता  अस्वस्थ  करीत  आहे.प्रशांतच्या   आईवडिलांच्या डोळ्यातील आसवांकडे आणि प्रशांतची धाकटी बहिण पूजा हिला धायमोकलून रडताना पाहिल्यावर पाहणार्‍याचे डोळेही अलगद ओले होतात. आमच्या प्रशांतच्या जीवाचे बरेवाईट तर झाले नसेल ना? तो कुठे असेल, तो अन्नपाण्याविणा कसा रहात असेल असे एक अनेक प्रश्न ते ज्याला त्याला विचारत असतात. माझा प्रशांत कुणाला दिसल्यास सांगा, मला त्याला शिकवून साहेब करायचं आहे. मोठं करायचं आहे. प्रशांतने बघितलेली स्वप्ने मला वास्तवात बघायची आहे, कुणाला दिसला काहो माझा प्रशांत! अशा कापर्‍या आवाजात चौकशी करणारे त्याचे आईवडील चंद्रमोळी झोपडीच्या दारात बसून त्याच्या येणार्‍या मार्गाकडे एकटक लक्ष देवून आहे. प्रशांतच्या अचानक बेपत्ता होण्याने एका गरीब कुटुंबाची झालेली अवस्था दूर करण्यासाठी पोलीस प्रशासन व समाजातील जीवंत मनाच्या माणसांनी त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पोलिसांनीही त्याचा लवकर शोध घेण्याची विनवणी करीत आहे.(तालुका प्रतिनिधी)