शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.समोरील दुभाजकाला सौंदर्यीकरणाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 23:42 IST

मिनी मंत्रालय म्हणून ओळल्या जाणाऱ्या स्थानिक सिव्हील लाईन भागातील जिल्हा परिषदेच्या इमारतीसमोरील रस्ता दुभाजकाची दैनावस्था झाली आहे.

ठळक मुद्देसाध्या रंगरंगोटीचाही विसर : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज

आॅनलाईन लोकमतवर्धा : मिनी मंत्रालय म्हणून ओळल्या जाणाऱ्या स्थानिक सिव्हील लाईन भागातील जिल्हा परिषदेच्या इमारतीसमोरील रस्ता दुभाजकाची दैनावस्था झाली आहे. या रस्ता दुभाजकात विविध रोपटे लावणे क्रमप्राप्त असता सदर रस्ता दुभाजकाच्या सौंदर्यीकरणाकडे संबंधीत विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रस्ता दुभाजक तयार केल्यापासून साधी रंगरंगोटीही करण्यात आली नसल्याचे दिसून येते. या रस्ता दुभाजकाचे तात्काळ सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी मागणी आहे.गत दोन वर्षांपासून शासनाच्यावतीने ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे. विविध शासकीय कार्यालयांना रोपटे लावण्याचे व लावलेल्या रोपट्यांचे जतन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मागील दोन वर्षांमध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी रोपटे लावण्यात आली असली तरी जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरातील अनेक रस्ता दुभाजकांमध्ये रोपटे लावण्याचा विसर शासकीय यंत्रणेला पडल्याचे दिसून येते. ज्या कार्यालयाच्या इमारतीतून संपूर्ण जिल्ह्यात विविध योजना राबविल्या जातात त्याच मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जि.प. कार्यालयाच्या समोरील रस्ता दुभाजक गत अनेक वर्षांपासून सौंदर्यीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेतील अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वसामान्यांचे प्रतिनिधीत्त्व करणाºया लोकप्रतिनिधींच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवाय सिव्हील लाईन भागातील डॉ. आंबेडकर पुतळा चौक ते बापूराव देशमुख यांच्या पुतळ्या पर्यंतच्या मार्गावरील काही पथदिवे बंद असल्याने या परिसरात काळोख असतो. याचा महिलांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छ व सुंदर वर्धा या हेतूने सिव्हील लाईन भागातील जि. प. कार्यालयासमोरील डॉ. आंबेडकर पुतळा चौक ते बापूराव देशमुख यांच्या पुतळ्या पर्यंतच्या मार्गावरील रस्ता दुभाजकाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी आहे.सुरक्षा पेट्याही तुटल्यासिव्हील लाईन भागातील डॉ. आंबेडकर पुतळा चौक ते बापूराव देशमुख यांच्या पुतळ्या पर्यंतच्या मार्गावरील रस्ता दुभाजकामध्ये पथदिव्यांसाठी सुमारे १३ लोखंडी खांब उभे करण्यात आले आहेत;पण ज्या सुरक्षा पेटीतून पथदिव्यांना विद्युत पुरवठा करण्यात आला आहे, त्याच सुरक्षा पेट्या संध्या तुटलेल्या असल्याचे दिसून येते. उघड्या सुरक्षा पेट्या एखाद्या अनुचित घटनेला आमंत्रण देत असून तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.अल्पावधीत सळाखी पडल्या उघड्याजिल्हा परिषद कार्यालयासमोरील रस्ता दुभाजक तयार केल्यापासून त्याला साधी रंगरंगोटीही करण्यात आली नसल्याचे चित्र बघावयास मिळते. इतकेच नव्हे तर संबंधीत विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे त्यावेळी तयार करण्यात आलेल्या रस्ता दुभाजकाच्या सध्या कडाही खचल्या आहेत. शिवाय रस्ता दुभाजकाच्या सळाखीही काही ठिकाणी उघड्या पडल्या आहेत. अल्पावधीतच रस्तादुभाजकातील सळाखी उघड्या पडल्याने त्यावेळी झालेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.