शहरं
Join us  
Trending Stories
1
Diwali Muhurat Trading 2025: शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
2
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
3
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
4
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
5
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
6
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
7
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
8
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
9
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
10
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
11
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
12
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
13
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
14
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
15
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
16
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
17
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
18
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
19
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
20
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...

बोंडअळीच्या अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:26 IST

गतवर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे परिसरातील बळीराजा पुरता हादरला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी कोणते पीक घ्यावे या विवंचनेत परिसरातील शेतकरी आहे. त्याला कपाशीला पर्याय मात्र मिळालेला दिसत नाही.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची अडचण वाढली : जिल्हा प्रशासनातील वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : गतवर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे परिसरातील बळीराजा पुरता हादरला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी कोणते पीक घ्यावे या विवंचनेत परिसरातील शेतकरी आहे. त्याला कपाशीला पर्याय मात्र मिळालेला दिसत नाही. सोयाबीन हे हमखास उत्पन्न देणारे पीक राहिले नसून गेल्या ४ वर्षांपासून सोयाबीनचीही नापिकी होत आहे. अवघ्या काही दिवसात शेतकरी पेरणीच्या कामाला वेग देणार असून अद्यापही त्यांना बोंडअळीने केल्याने नुकसानीची शासकीय मदत मिळाली नाही. ती त्वरित मिळावी यासाठी जिल्हा पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य पावले उचलण्याची मागणी आहे.कोरडवाहू शेतकरी एकट्या सोयाबीन पिकावरही अवलंबून राहू शकत नाही. दोन वर्षांपूर्वी दहा हजार रूपये क्विंटल एकढा भाव मिळालेली तूर यंदा नाफेडला देता देता तूर उत्पादकांच्या नाकात दम आला आला आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या घरी अजूनही तूर पडून आहे. ज्यांनी तूर विकली त्यांना नवीन हंगाम जवळ येऊनही पैसे मिळालेले नाही. या दृष्टचक्रात सापडलेला शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे. परिसरातील कृषी केंद्रातही सध्या पाहिजे तशी गर्दी शेतकरी बियाणे खरेदी करण्यासाठी करीत नसल्याचे दिसते. परंतु, येत्या काही दिवसात ही परिस्थिती बदलेल अशी चर्चा होत आहे. यंदाही कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कायम राहिल काय व आपले नुकसान होईल काय अशी चर्चा सध्या शेतकऱ्यांमध्ये होत आहे. कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी या भागातील शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत. तसेच नुकसानग्रस्तांना तात्काळ शासकीय मदत मिळावी यासाठी संबंधितांनी प्रयत्न करावे, अशी मागणी आहे.कृषी केंद्रातही गर्दी नाहीचपूर्वी मे महिन्याच्या अखेरीस व जून महिन्याच्या सुरूवातीला बियाणे व खत खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रांमध्ये गर्दी करीत होते. परंतु, यंदा कपाशीची लागवड करावी की इतर दुसऱ्या पिकाची लागवड करावी, अशी परिस्थिती शेतकºयांसमोर असल्याने जून महिन्याची चार तारीख लोटूनही कृषी केंद्रात गर्दी होताना दिसत नाही.दरवर्षी आजपावेतो ५५ ते ३० टक्के बियाणाची विक्री होत असते. परंतु, यावर्षी एकही शेतकरी दुकानाकडे मागणी करण्यास आलेला नाही. त्यामुळे या वर्षी कपाशीची लागवड कमी होईल, असे दिसते. खताच्याही किंमती वाढल्यामुळे शेतकºयामध्ये नाराजी असल्याचे दिसते.- पंढरी ढगे, कृषी व्यावसायिक पवनार.गेल्या वर्षी निकृष्ट बियाणे दिल्याची ओरड झाली. उत्पन्नात कमालीची घट झाली. शेतीत लावलेले पैसेही मिळाले नाही. तेव्हा कपाशीची लागवड करावी की नाही या विवंचनेत आहो.- रामदास चोंदे, शेतकरी, पवनार.बोंडअळीचा प्रकोप होऊ नये यासाठी शासनस्तरावर जोरदार मोहीम राबविण्यात येत आहे. वेळोवेळी सर्वेक्षण करण्यासाठी कृषी विभागाने तज्ञांच्या वेगळ्या चमु तयार केल्या आहे. त्यावर ते वेळोवेळी लक्ष ठेवतील. शेतकºयांनी लवकर येणाºया जातींची निवड करावी व तणनाशक (ग्लायफोसेट) फवारू नये.- प्रशांत भोयर, कृषी सहायक, पवनार.

टॅग्स :cottonकापूस