शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील कचऱ्याने बुजविला जातोय वाघाडी नाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 23:32 IST

राज्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी व नाल्यांचे खोलीकरण करण्याचे काम जोमाने सुरू आहे. स्थानिक नगर पंचायत मात्र गावातील वाघाडी नाला बुजवित असल्याचे समोर येत आहे. शहरातील कचरा वाघाडी नाल्यात टाकून नाला बुजविण्याचा अफलातून प्रकार येथे सुरू आहे.

ठळक मुद्देनगर पंचायत प्रशासनाचा अफलातून कारभार : वाघाडी फाऊंडेशनकडून तीव्र विरोध

आॅनलाईन लोकमतसमुद्रपूर : राज्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी व नाल्यांचे खोलीकरण करण्याचे काम जोमाने सुरू आहे. स्थानिक नगर पंचायत मात्र गावातील वाघाडी नाला बुजवित असल्याचे समोर येत आहे. शहरातील कचरा वाघाडी नाल्यात टाकून नाला बुजविण्याचा अफलातून प्रकार येथे सुरू आहे.हा नाला बुजल्यास पावसाळ्यात लगतची झोपडपट्टी व परिसरातील शेतात पाणी शिरण्याचा धोका आहे. यात मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर पंचायतने कचरा डेपो निर्माण करून तेथे शहरातील घनकचरा जमा करणे तथा तेथे सावनेर मॉडेलप्रमाणे गांडुळ खत, बायोगॅस आदी प्रकल्प राबवावे, अशी मागणी गटनेता मधुकर कामडी यांनी केली आहे. नुकताच घनकचऱ्याविषयीचा अभ्यास दौरा सावनेर येथे सर्व नगरसेवक, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी केला; पण यावर कार्यवाही करणे सोडून वाघाडी नाला बुजविला जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शहरातून गोळा करण्यात आलेला कचरा वाघाडी नाल्यात टाकला जात आहे. परिणामी, नाल्यातून वाहणारे पाणी दूषित होत असल्याचे दिसते. ते पाणी पिल्यामुळे गुरांमध्ये आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. कधी काळी ओसंडून वाहणारा हा नाला आता कचऱ्याने बुजविला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.पेटत्या कचऱ्यामुळे धोक्याची शक्यताशहरातून गोळा करण्यात आलेला कचरा सध्या वाघाडी नाल्याच्या पात्रात टाकला जात असल्याचे दिसून येत आहे. सदर कचरा त्याच ठिकाणी जाळला जात असल्याने त्या धूरामुळे तथा दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे. शिवाय दूषित पाणी पिल्यामुळे गुरांतील आजार वाढत असल्याचे दिसून येत आहे.स्मशानभूमिच्या बाजूला असलेल्या जागेवर कटघरे करून तेथे घनकचरा जमा करण्यात येणार आहे; पण त्याला अद्याप मंजुरी न मिळाल्याने तात्पुरता नाल्यात घनकचरा टाकण्यात येत आहे.- शीला सोनारे, अध्यक्ष, नगर पंचायत, समुद्रपूर.गावाची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदीच्या पात्रात एकेकाळी गुरांसाठी पिण्याच्या पाण्याचा मुबलक साठा राहत होता; पण आता नगर पंचायतीने तेथे कचरा टाकून नदीला प्रदूषित करण्याचे व बुजविण्याचे कार्य अगदी प्रामाणिकपणे हाती घेतले आहे. या बाबीला फाऊंडेशनचा विरोध आहे. नगर पंचायतीने कचऱ्याची विल्हेवाट नियोजीत डम्पिंग ग्राऊंडवर लावणे गरजेचे आहे.- मंगश भूत, अध्यक्ष, वाघाडी फाऊंडेशन, समुद्रपूर.