शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मतदान केंद्राधिकाऱ्यांनी सूचीतील नियमांचे पालन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 23:45 IST

मतदान प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी आयोगाने दिलेल्या सूचीचे काटेकोरपणे पालन करावे. स्वत:च्या मनाने कुठलेही निर्णय घेऊ नये किंवा कुठलेही काम करु नये अशा सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिल्यात.

ठळक मुद्देभिमनवार : विधानसभा संघातील कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मतदान प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी आयोगाने दिलेल्या सूचीचे काटेकोरपणे पालन करावे. स्वत:च्या मनाने कुठलेही निर्णय घेऊ नये किंवा कुठलेही काम करु नये अशा सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिल्यात.विद्यादीप सभागृहात देवळी विधानसभा क्षेत्रातील निवडणूकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण मंगळवारी घेण्यात आले यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी वर्धा लोकसभा निवडणुकीच्या मुख्य सामान्य निरिक्षक एन.टी.अबरु, सहाय्यक जिल्हाधिकारी मनुज जिंदाल, देवळी विधानसभा क्षेत्राच्या सहाय्यक निवडणूक अधिकारी दिप्ती सुर्र्यवंशी, देवळीचे तहसीलदार राजेश सरवदे उपस्थित होते.क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व मतदान केंद्राला भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी करावी. मतदान केंद्रावर पुरविण्यात येणाऱ्या २३ प्रकारच्या सुविधा यामध्ये स्वच्छता, पिण्याचे पाणी, उन्हापासुन संरक्षणसाठी शेड, दिव्यांगासाठी रॅम्प असल्याची खात्री करुन घ्यावी. प्रत्येक मतदान केंद्रावर व्ही.व्ही.पॅट मशीन वापरण्यात येणार असल्याने त्यांना व्यवस्थित हाताळावे. मशीनला कुठेही छेडछाड करु नये. कर्मचाऱ्यांनी एकमेकाशी समन्वय साधून कामे करावी. मतदान प्रक्रिये दरम्यान मशीन बंद पडल्यास तात्काळ क्षेत्रिय अधिकाऱ्यांना अथवा तहसिलदार यांना सूचना द्याव्यात. मतदान प्रक्रियेत नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपले मतदान करण्यासाठी ईपीक कार्ड किंवा पोस्टल बॅलेट देण्याचा पर्याय निवडून १०० टक्के मतदान करण्याचा आदर्श निर्माण करावा. लोकशाही टिकविण्यासाठी आपले कर्तव्य आहे हे समजून काम करावे. कदाचित आपल्याला सुविधा मिळाल्या नाहीत तरीही कर्तव्य पार पाडावे अशा सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी यावेळी केल्यात.मतदान केद्राध्यक्षांनी बॅलेट युनीट, कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट कॅरीग मशीन मधून बाहेर काढून अशा प्रकारे मतदान केंदात ठेवावे की जेणेकरुन मशीनचे केबलचा अडथळा मतदारांना होणार नाही याची काळजी घ्यावी. केबल जोडणी करतांना लाल व काळा रंग जुळवून जोडावा. व्हीव्हीपॅटचा पेपर लॉक नॉब उभ्या स्थिती मध्ये करुन मशीन हलू नये. सर्व जोडणी झाल्यावर कंट्रोल युनीट सुरु करुन सर्व डिस्प्ले वरील दिनांक वेळ आणि अनुक्रमांकाची आणि हिरवा दिवा चालु झाल्याची खात्री करुन घ्यावी. त्यानंतर उमेदवार किंवा प्रतिनिधीसमोर मॉक पोल घ्यावे. कंट्रोल युनिट सुरु करण्यापुर्वी काय करावे, मॉक पोल, मतदानादरम्यान मशीन बदलावी लागल्यास काय करावे, मतदान संपतांना काय करावे, आदी माहितीचे प्रशिक्षण दिप्ती सुर्यवंशी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिले.यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना व्हीव्हीपॅट मशीन हाताळण्याचे प्रात्याक्षिक करुन दाखविण्यात आले. तर वर्धा मतदार संघातील प्रशिक्षणाला मुख्य मार्गदर्शक म्हणुन उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार प्रिती डूडूलवार उपस्थित होत्या.वर्धा विधानसभा मतदार संघातील पहिल्या टप्प्यातील दोन सत्रात १८०० कर्मचाऱ्यांना सरोज मंगल कार्यालय येथे प्रशिक्षण देण्यात आले.

टॅग्स :Electionनिवडणूक