शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

‘आवाज वाढव डिजे’वर थिरकली तरूणाई...

By admin | Updated: January 7, 2017 00:53 IST

... आवाज वाढ डिजे तुझ्या.. हे गाणे आदर्श शिंदे सादर करताच अख्या मैदानात उपस्थित तरुणाई थिरकल्याचे दिसून आले.

वर्धा कला महोत्सवाचे थाटात उद्घाटन : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वर्धा : ... आवाज वाढ डिजे तुझ्या.. हे गाणे आदर्श शिंदे सादर करताच अख्या मैदानात उपस्थित तरुणाई थिरकल्याचे दिसून आले. निमित्त होते वर्धा कला महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे. या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी झाले. वर्धा कला महोत्सव समिती व श्री. दत्ता मेघे फाऊंडेशन, वर्धा द्वारा आयोजित वर्धा कला महोत्सवाचे उद्घाटन अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी अभ्युदय मेघे, तर स्वागताध्यक्ष म्हणून आ. पंकज भोयर होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अतुल तराळे, कला महोत्सवाचे अध्यक्ष संदीप चिचाटे, अशोक झाडे, स्वागत समिती अध्यक्ष वरूण पांडे, संजय इंगळे तिगावकर, नगरसेवक व उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, अभिजित श्रावणे, पवन तिजारे, अशोक झाडे, विकास फटींगे, उषाताई फाले, अनिल नरेडी, गणेश ढवळे, गौरव ओंकार यांची विराजमान होते. सिंधूताई सपकाळ यांनी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. तसेच मिश्कील शैलीतून समाज जीवनावर प्रकाश टाकला. त्यांनी आपल्या अनुभवातून समाजाला प्रबोधन करत पोलीस मित्रांचे आभार मानले. स्वागताध्यक्ष आ. डॉ. पंकज भोयर यांनी कला महोत्सवातील विविध स्पर्धांचा उल्लेख करीत महोत्सव वर्धेतील सांस्कृतिक चळवळी जोमाने समोर नेले, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविकातून संदीप चिचाटे यांनी कला अविष्काराचा रंगमंच म्हणजे कला महोत्सव असे मत मांडले. अभ्युदय मेघे यांनी अध्यक्षीय भाषणातून माईच्या हस्ते महोत्सवाचे झालेले उद्घाटन म्हणून महोत्सवाच्या यशाचे गमक होय, असे प्रतिपादन केले. याप्रसंगी कला महोत्सव समिती व दत्ता मेघे फाऊंडेशन तर्फे माईचा जाहीर सत्कार करण्यात आला व एक लाख रुपयांचा धनादेश गोरगरीबांच्या सेवेसाठी झटणाऱ्या मार्इंना सुपूर्द करण्यात आला. उद्घाटनानंतर सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, कार्तिकी गायकवाड, जान्हवी प्रभू अरोरा यांच्या सदाबहार मराठी गीतांचा कार्यक्रम पार पडला. यात फुलापेक्षा मराठी गीतांची रेलचेल पहायला मिळाली. आदर्श शिंदे यांच्या पहाडी आवाजातील ‘अगडबंब नगाडा’ या गिताने उपस्थितांची मने जिंकली तर ‘कोंबडी पळाली, माझा नवीन पोपट हा’ या सारख्या गितांनी तरूणाईला थिरकायला भाग पाडले. कार्तिकी गायकवाड हिने ‘घागर घेवून निघाली’ या सारख्या गीतातून रसिकांची दाद घेतली तर जान्हवी प्रभू अरोरा यांनी ‘मितवा सावर रे मना’ या गीतातून तरूणाईला वेड लावले. उद्घाटनापूर्वी स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यात आला. याप्रसंगी आकाश दुर्गे यांच्या नेतृत्वात मल्लखांबाचे उत्कृष्ट सादरीकरण केले, तर लोकधारा मंच समूह संच, ३२ डान्स, वेदिका डान्स अकॅडेमीने एकापेक्षा एक नृत्यविष्कार सादर केले. संचालन सुप्रसिद्ध अभिनेती किरण शराद यांनी केले. कार्यक्रमाला वर्धा शहरातील मान्यवर व उपस्थित श्रोत्यांनी मोठ्या संख्येनी हजेरी लावून कार्यक्रम यशस्वी केला.(प्रतिनिधी)