लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील डीएड व बीएडच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी आपल्या विविध मागण्यांसाठी विद्यापीठातील उपकुलगुरूंच्या दालनासमोर धरणे दिले. यावेळी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी हिताचा विचार न करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाचा मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध नोंदविला. विशेष म्हणजे या प्रकरणी विद्यापीठाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तेथील जबाबदार अधिकाऱ्यांनी बोलण्याचे नाकारले.महात्मा गांधी आंतराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठात शिक्षा विभागाच्यावतीने बीएड व एमएड (एकीकृत) अभ्यासक्रम चालविल्या जात आहे. मागील चार वर्षांपासून बीएड अभ्यासक्रम येथे सुरू असून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आणि यूजीसी नेटच्या परीक्षेकरिता या विद्यापीठाचे नाव येत नाही. शिवाय बीएड व एमएड अभ्यासक्रम देशातील इतर राज्यांमधील विद्यापीठांशी हे विद्यापीठ सलग्न नाही. यामुळे याचा शैक्षणिक फटका हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्याचा आरोप करीत या प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात यावी, ही मुख्य मागणी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी रेटली. हिंदी विद्यापीठाकडून आवश्यक कार्यवाही न करण्यात आल्याने येथे बीएड आणि एमएडचे शिक्षण घेणाºया सुमारे ८० भावी शिक्षकांचे भविष्यच धोक्यात आले आहे. सदर प्रकार लक्षात आणून दिल्यावरही हिंदी विद्यापीठ प्रशासन दडपशाही प्रणालीचा अवलंब करीत असून आम्ही त्याचा निषेध करीत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी हजर होते.
हिंदी विद्यापीठात भावी शिक्षकांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 23:58 IST
येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील डीएड व बीएडच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी आपल्या विविध मागण्यांसाठी विद्यापीठातील उपकुलगुरूंच्या दालनासमोर धरणे दिले.
हिंदी विद्यापीठात भावी शिक्षकांचा एल्गार
ठळक मुद्देविविध मागण्यांसाठी धरणे : ‘विद्यापीठ प्रशासन मुर्दाबाद’च्या घोषणा