हिंगणघाट : राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव चौकातून शहरातील प्रमुख मार्गाने प्रबुद्ध नगरातील सम्यक बुद्ध विहारात पोहोचलेल्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थी धातू कलशाचे हजारो नागरिकांनी दर्शन घेतले. गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थी कलशाचे नांदगाव चौकात आगमण होताच प्रलय तेलंग व नागरिकांनी अस्थीकलशाचे स्वागत केले. नांदगाव चौकातून हजारो बांधवांच्या उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गाने निघालेली रॅली प्रबुद्ध नगर सम्यक बुद्ध विहारात पोहोचली. शांततेच्या वातावरणात हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील हजारो नागरिकांनी शिस्तबद्धरीत्या अस्थी-कलशाचे दर्शन घेतले. यावेळी समितीचे मुख्य आयोजक प्रलय तेलंग, सदस्य सुमेध पाटील, बाळू भालशंकर, संजय वानखेडे, गोलू इंदुरकर, राजू फुलझेले, अरुण भोंगाडे, मनोहर शेंदरे, सोपान वासेकर, अमीत झांबरे, विनीत कांबळे, मंथन इंदुरकर, नीलिमा वावरे, सीमा मेश्राम, भारती झांबरे, निर्मला भोंगाडे, वैशाली भगत, सूमन पाटील, सविता वासनिक आदींसह नागरिकांचे योगदान लाभले. तथागत भगवान गौतम बुद्धाच्या पवित्र अस्थिधातू कलशाचे आगमण व ५९ व्या धम्मचक्र प्रर्वतन दिनाच्या निमित्ता हिंगणघाट बुद्धीस्ट ग्रुपचे मुख्य आयोजक प्रबुद्धनगर मित्र परिवारतर्फे आयोजित भोजनदान कार्यक्रमाचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाला विक्की वाघमारे, कुणाल जाभुळकर, सुरज गावंडे, नितीन इंदुरकर, प्रज्वल वाणे, अभय दारूंडे, अमरदीप बंसोड, अमीत झांबरे, अभय सोरदे, अमोल ढोरेकर, अमोल बागेट्टवर, सुशील जांभुळकर, पुर्वेश चंदनखेडे, अमीत ढोरेकर, संदेश मून, नितेश वावरे, कौस्तुभ गोडघाटे, सौरभ कांबळे, सुशील इंदुरकर, मंथन इंदुरकर, सक्षम मेश्राम आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)
नागरिकांनी घेतले बुध्दांच्या अस्थिकलशाचे दर्शन
By admin | Updated: October 18, 2015 02:30 IST