शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लोकचळवळ उभारल्यास गावे पाणीदार होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 23:45 IST

पावसाचे पाणी हे आपल्या हक्काचे पाणी आहे. पण ते टिकवून ठेवण्यासाठी लोकचळवळ उभारणे गरजेचे आहे. तेव्हाच दुष्काळ नाहीसा होवून प्रत्येक गाव पाणीदार होईल, असे प्रतिपादन महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. चारूलता टोकस यांनी केले.

ठळक मुद्देचारूलता टोकस : कविठगाव येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी केले श्रमदान

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : पावसाचे पाणी हे आपल्या हक्काचे पाणी आहे. पण ते टिकवून ठेवण्यासाठी लोकचळवळ उभारणे गरजेचे आहे. तेव्हाच दुष्काळ नाहीसा होवून प्रत्येक गाव पाणीदार होईल, असे प्रतिपादन महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. चारूलता टोकस यांनी केले.पाणी फाऊंडेशनद्वारे आयोजित वॉटर कप स्पर्धेसाठी देवळी तालुक्यातील कविठगावची निवड करण्यात आली आहे. तेथे स्पर्धेला केंद्रस्थानी ठेवून श्रमदानातून जलसंवर्धना संदर्भात विविध कामे केली जात आहेत. हे गाव अ‍ॅड. टोकस यांनी गाठून स्वत: श्रमदान केले. यावेळी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या. श्रमदानाचे अभूतपूर्व कार्य करण्यासाठी गावातील शेकडो नागरिकांचे हात सरसावले आहेत. या श्रमदानामध्ये सहभागी होवून अ‍ॅड. चारूलता टोकस यांनी गावकºयांसह प्रत्यक्ष श्रमदान केले. पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेमुळे गावामध्ये श्रमदानाच्या माध्यमातून परिसर पाणीदार करण्यासाठी विविध कामे केली जात आहेत. यावेळी पं.स.सदस्य कल्याण ढोक, सरपंच निला खेडकर, दिनेश धांदे, राजाभाऊ खेडकर, देविदास तिनघसे, लक्ष्मण कांबळे, विकास ढोक, उत्तम वºहाडे, बाभुळकर बोबडे, सचिन बोबडे, अशोक आठबैले, अनंता जोगवे, खोंड, झांजरी आदींनी श्रमदान केले. 

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा