शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पळसगाव (बाई) मध्ये गावबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 05:00 IST

मागील महिन्यात गुडी पाडव्याच्या दरम्यान असणारी संत सखुआईची यात्रा कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन रद्द करण्यात आली. या गावात एकोपा असून सध्या धडाडीचा निर्णयच सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने घेतला आहे. इतकेच नव्हे तर केंद्र व राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन या गावात सध्या केले जात आहे. गावबंदीचा निर्णय सरपंच धीरज लेंडे, ग्रा.पं. सदस्य तसेच विविध समितींच्या सदस्यांच्या नेतृत्त्वात घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देसुरक्षित गावासाठी ग्रामस्थांचा निर्णय : दवंडीद्वारे दिली जातेय माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे) : नजीकच्या ३ किमी अंतरावरील पळसगाव (बाई) हे गाव संत सखुआईच्या वास्तव्याने विदर्भात प्रसिद्ध आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसला तरी जगात या विषाणूने थैमान घातले आहे. सुरक्षीत गावासाठी या गावातील नागरिकांनी गावबंदीचा निर्णय घेतला आहे. शिवाय गावात येणाऱ्यांना गावाच्या प्रमुख मार्गावर अडवून अधिकची माहिती दिली जात आहे.मागील महिन्यात गुडी पाडव्याच्या दरम्यान असणारी संत सखुआईची यात्रा कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन रद्द करण्यात आली. या गावात एकोपा असून सध्या धडाडीचा निर्णयच सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने घेतला आहे. इतकेच नव्हे तर केंद्र व राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन या गावात सध्या केले जात आहे. गावबंदीचा निर्णय सरपंच धीरज लेंडे, ग्रा.पं. सदस्य तसेच विविध समितींच्या सदस्यांच्या नेतृत्त्वात घेण्यात आला आहे. गावाच्या मुख्य प्रवेश मार्गावर चौकी तयार करण्यात आली आहे. संचारबंदीचा भंग न होऊ देता एकूण ३० स्वयंसेवक आळीपाळीने येथे सेवा देत आहेत. अतिशय आवश्यक कारणाशिवाय कुणालाही गावात जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच गावात जाणाºयाला सेनेटाईज करून गावात सोडले जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या सूचना या गावातील नागरिकांना दवंडीच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. शिवाय गाव निर्जंतूक केले जात आहे. तर इतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. आरोग्य केंद्रातील डॉ. अमोल शेळके, शशिकांत अडसड, सपना तळवेकर हे दररोज त्यांची तपासणी करीत आहेत. बाहेर गावातील मजुरांना अन्नधान्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे. या गावबंदी व इतर समस्यावर गावाचे सरपंच धीरज लेंडे, उपसरपंच बोरकुटे, पोलीस पाटील रत्नाकर देवतळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष कैलास बोरकर, ग्रा.पं. सदस्य दिलीप घुंगरे, कुबडे, वाणी, धाबडधुस्के इतर सदस्य लक्ष ठेवून गावात जनजागृती करीत आहे. तसेच स्वयंसेवक म्हणून अमोल पांडव, पुरुषोत्तम नासरे, राकेश पांडव, वैभव पेटकर, नितेश द्रुगवार, अमित रेवतकर, रुपेश लाखे, अरुण बारइ, प्रकाश रेवतकर, समीर कुबडे, शंकर झंझाडे, रिकी वाघमारे, हर्षद गोलहर, आदित्य बोरकर, गणेश दुर्गवार, आशिष सातघरे, साजीत शेख व इतर गावातील तरुण मंडळी जबाबदारी पार पाडत आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसsarpanchसरपंच