शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

तळेगावात वाहताहेत गावठी, देशी, विदेशी दारूचे पाट

By admin | Updated: November 27, 2014 23:39 IST

परिसरात मोठ्या प्रमाणात बनावट देशी तसेच हातभट्टीची गावठी दारू विकली जात आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने दारूविक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे़

तळेगाव (श्या.पं.) : परिसरात मोठ्या प्रमाणात बनावट देशी तसेच हातभट्टीची गावठी दारू विकली जात आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने दारूविक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे़ वाढत्या दारूविक्रीमुळे गावातील शांतता मात्र भंग होत आहे़ याकडे लक्ष देत दारूविक्रीवर आळा घालावा, अशी मागणी होत आहे़ गावात नवीन पोलीस स्टेशन स्थापन झाले; पण ते नावापूरते असल्याचे दिसते़ गावात २४ तास दारूच्या पुरवठ्याची सेवा उपलब्ध आहे़ दारूबंदी असलेल्या गांधी जिल्ह्यात इथल्याप्रमाणे मोबाईल वर दारू ही सेवा आर्वी मतदार संघात कुठेही दिसून येत नाही. अमरावती जिल्ह्यात ड्राय डे च्या दिवशी दारू मिळत नाही़ यामुळे तिवसा जि़ अमरावती परिसरातील मद्यपि मुबलक दारू मिळत व बिअरबारप्रमाणे व्यवस्था असल्याने गावात येतात. या परिसरात सुमारे २० ते २५ गावठी दारूचे व्यवसाय आहेत़ ५ ते ७ बनावट देशी दारू व विदेशी दारूचे व्यवसाय आहेत़ अनेक जण राष्ट्रीय महामार्गावर धाब्याच्या साह्याने व मोबाईलवर फोन करताच दारू उपलब्ध करून देतात़ काही वॉर्डात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढीस लागला आहे. पोलीस ठाण्यात यातील अनेक दारूविक्रेत्यांचे रेकॉर्ड आहे. अनेकांवर न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत. यामुळे या अवैध दारू व्यवसायात कुणाचा समावेश आहे, हे पोलिसांना वेगळे सांगण्याची गरज नाही. अनेक जण कित्येक पिढ्यांपासून अवैध दारूविक्रीच्या व्यवसायात गुंतले आहेत़ बस स्थानक चौकात, पानटपरी, ढाबा, कॅन्टीन व काही घरी दारूचा व्यवसाय सुरू आहे. उल्लेखनीय म्हणजे लहान मुलांनाही दारू कुठे मिळते, हे माहिती असताना पोलीस अनभिज्ञ असावे, ही बाब रूचणारी नाही. सहजरित्या उपलब्ध होणाऱ्या दारूमुळे मद्यपिंची संख्या वाढली आहे. अनेकांचे संसार दारूमुळे उद्ध्वस्त होत आहे. २०१० ते १४ पर्यंत बनावट देशी-विदेशी व हातभट्टीच्या दारूमुळे ४० जणांचा बळी गेला आहे, अनेकांना दारूच्या अतिव्यसनामुळे जीवघेणे आजार जडलेत़ यामुळे पोलिसांनी दारूविक्रेत्यांविरूद्ध मोहीम उघडून गावातून दारू पूर्णपणे हद्दपार करणे गरजेचे झाले आहे़(वार्ताहर)