शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

युवकाच्या शस्त्रक्रियेसाठी गावकरी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 23:41 IST

येथील सुरज महेंद्र नगराळे(२३) याच्या पोटातील आतड्यामध्ये गँगरींग झाल्याचे निदान सावंगी रुग्णालयात करण्यात आले व ताबडतोब नागपूरला हलवून शस्त्रक्रिया करण्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या शस्त्रक्रियेसाठी ्अवघ्या ६ तासात दीड लाख रूपये गोळा करण्यात आले.

ठळक मुद्दे६ तासात दीड लाख रूपये झाले जमा

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : येथील सुरज महेंद्र नगराळे(२३) याच्या पोटातील आतड्यामध्ये गँगरींग झाल्याचे निदान सावंगी रुग्णालयात करण्यात आले व ताबडतोब नागपूरला हलवून शस्त्रक्रिया करण्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या शस्त्रक्रियेसाठी ्अवघ्या ६ तासात दीड लाख रूपये गोळा करण्यात आले.सेवाग्राम येथून नागपूरला खासगी रूग्णालयात हलविल्यानंतर तिथेही ताबडतोब शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे सांगितले. सुरुवातीला ३ लाख व पुढील उपचारासाठी सात लाख असा अंदाजे १० लाखाचा खर्च सांगितला. वडिल ड्रायव्हर व आई शिवणकाम, बचत गटाची काम करणारी. कुठून आणणार एवढा पैसा, शस्त्रक्रिया झाली नाही तर सुरजचे प्राण वाचणे कठीण. ही वार्ता सुरजच्या मित्र परिवाराला कळली त्यांनी लगेच ही माहिती स्थानिक व्हॉटस अ‍ॅप ग्रुपवर टाकली आणि बघता बघता गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली. मित्र परिवार सुरजच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करायला पुढे आला व अवघ्या ५-६ तासात दिड-दोन लाखाची मदत जमा झाली. ही मदत जमा करण्यासाठी नितीन कवाडे, राहुल खोब्रागडे, अमोल उमाटे, अमोल शेंडे यांनी पुढाकार घेतला. नागरिकांनीही विश्वासाने त्यांना रक्कम दिली. जमा झालेली रक्कम आई-वडिलांचे स्वाधीन केल्यानंतर लगेच त्याची शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडली. सुरजच्या पोटातील आतड्यामध्ये गँगरिन आधुनिक शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याचेवर पुढील दोन महिने उपचार सुरू राहणार आहे. शेतकरी,शेतमजुर, व्यावसायिक भागवत सेवा समिती, महिला बचत गट, आॅटोचालक सामाजिक संघटना असे अनेक जण सुरजच्या मदतीला धावून आले.

टॅग्स :Healthआरोग्य