शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

ग्रामीणांची भाकर झाली श्रीमंतांची

By admin | Updated: May 18, 2015 02:04 IST

कधी काळी ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरात आहारात भाकर ही हमखास असायची.

वर्धा : कधी काळी ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरात आहारात भाकर ही हमखास असायची. परंतु जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन अत्यल्प होत असल्याने तसेच कार्यक्रमांमध्ये झुनका भाकरीचा टे्रंड वाढल्याने गरिबाची भाकर आता श्रीमंतांची झाली आहे. स्वादिष्ट आणि पचायला हलकी असणारी व कधीकाळी गरिबांच्या आहारातील भाकर अलिकडे श्रीमंतांच्या घरी होणाऱ्या बुफे नावाच्या आधुनिक प्रकारात मोठ्या दिमाखात मिरवित असते. भाकरीची जागा यात काही वर्षात चपातीने घेतलेली आहे. ज्वारीच्या तुलनेत गहू स्वस्त असल्याने व पोळी बनविणेही भाकरीच्या तुलनेत स्वस्त असल्याने महिला वर्गही पोळीलाच पसंती देतो. भारतात हरितकं्राती होण्याअगोदर बऱ्याच राज्यात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जायचे. कमीत कमी पाणी या पिकाला लागते. ज्वारी काढल्यानंतर राहिलेले कुटार, कडबा शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना खाद्य म्हणून वापरल्या जातो. परंतु कालांतराने हायब्रीड ज्वारी नावाचा प्रकार जन्माला आला. त्यामुळे ज्वारीची खरी चवही हरविली. तसेच उत्पादन घेणेही कमी झाले. परंतु नाविण्य म्हणून आता ही भाकर वेगवेगळ्या रुपात मोठमोठ्या कार्यक्रमात दिमाखात मध्यभागी दिसते. तसेच आवडीने ती झुनका व ठेच्याबरोबर खाल्ली जाते. तसेच जिल्ह्यात झुनका भाकर केंद्र नावाने नवा उद्योगही वाढीस लागला असून यात अनेक महिलांना चांगला रोजगार मिळाला आहे.(शहर प्रतिनिधी)