शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पवनारमध्ये ग्रामस्थांना घरपोच मिळतो ग्रामपंचायतीच्या जमा-खर्चाचा हिशेब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 11:44 IST

आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पूनित झालेल्या पवनार ग्रामपंचायतीमार्फत मागील तीन वर्षांपासून दरवर्षी ग्रा.पं. च्या जमा-खर्चाचा हिशेब ग्रामस्थांना पत्रकाद्वारे घरपोच दिला जात आहे. अशा प्रकारे जमा -खर्चाचा वार्षिक अहवाल सादर करणारी पवनार ही विदर्भातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.

ठळक मुद्देपवनार ग्रामपंचायतीचा उपक्रम विदर्भातील पहिलाच प्रयोग

अभिनय खोपडे ।आॅनलाईन लोकमतवर्धा : आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पूनित झालेल्या पवनार ग्रामपंचायतीमार्फत मागील तीन वर्षांपासून दरवर्षी ग्रा.पं. च्या जमा-खर्चाचा हिशेब ग्रामस्थांना पत्रकाद्वारे घरपोच दिला जात आहे. अशा प्रकारे जमा -खर्चाचा वार्षिक अहवाल सादर करणारी पवनार ही विदर्भातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.वर्धा तालुक्यात समाविष्ट असलेल्या पवनार ग्रा.पं. च्या सरपंचपदाची धुरा अजय गांडोळे यांच्याकडे आली. त्यांनी २०१४-१५ पासून ग्रामस्थांना गावातील जमा-खर्चाचा हिशेब सादर करणे सुरू केले. प्रत्येक गावात ग्रामसभेत जमा-खर्च व विकास कामांची माहिती वाचून दाखविली जाते. ग्रामीण भागात ग्रामसभेला ग्रामस्थांची १०० टक्के उपस्थिती राहत नाही. अनेक ठिकाणी ग्रामसभा कागदोपत्रीच आटोपल्या जातात; पण पवनार ग्रा.पं. ने एक पाऊल पुढे टाकत ही अभिनव पद्धती राबविण्याचा निर्णय घेतला. सरपंच अजय गांडोळे यांनी या कामात पुढाकार घेऊन ग्रा.पं. तर्फे दिवाळीच्या मुहूर्तावर वार्षिक अहवाल तयार करण्याचा निर्णय घेतला.अहवालात त्या वर्षातील विकास कामांचा आढावा घेण्यासोबतच ग्रा.पं.च्या वार्षिक खर्चाचे विवरण देण्याचीही पद्धती सुरू केली. यामुळे ग्रामस्थांना ग्रामपंचायत प्रशासनातील पारदर्शकता ठळकपणे दिसू लागली. यंदाही २०१६-१७ चा जमा खर्च ग्रामस्थांना सादर करण्यात आला असून २०१७-१८ या वर्षात होणाऱ्या विकास कामांची माहितीही देण्यात आली आहे.सेवाग्राम, पवनार, वर्धा या विकास आराखड्यात पवनार गावातही अनेक कामे होणार आहेत. या कामांची माहिती यानिमित्ताने देण्यात आली आहे. २०१५-१६ च्या आराखड्यात आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून पवनार गावात करण्यात आलेल्या कामांचा तथा स्थळांचा उल्लेखही करण्यात आला आहे. पवनार ग्रा.पं. च्या या अभिनव कार्याची आदर्श ग्राम योजनेचे महाराष्ट्र अध्यक्ष पोपटराव पवार यांनीही प्रशंसा केली आहे.

विकास कामांबाबत नागरिकांना घरपोच माहिती देण्यासोबत ग्रामपंचायतीचा जमा-खर्चही घरपोच देण्याचे काम ग्रा.पं. मार्फत सुरू आहे. यामुळे नागरिकांना गावात प्रस्तावित विकास कामे, पूर्ण झालेली कामे, यासोबतच निधीतून किती रक्कम आली, खर्च किती झाला याची माहिती उपलब्ध होत आहे. अजय गांडोळे सरपंच झाल्यानंतर या उपक्रमाची सुरुवात झाली. 

- वसंतराव उमाटे, रहिवासी, पवनार.

सरपंचपदाची धुरा आल्यानंतर गावात विकासात्मक दृष्टिकोनातून कामे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पवनारला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गावाच्या विकासासाठी लोकांचा सहभाग गरजेचा आहे. गांधीवादी लोकांनाही विश्वासात घेऊन काम करीत असताना ग्रामस्थांना त्यांच्या कराच्या रकमेतून गावासाठी काय-काय होत आहे, याची माहिती व्हावी म्हणून वार्षिक अहवाल प्रसिद्ध करून तो लोकांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम सुरू केला. यामुळे लोकांचाही ग्रामपंचायतीच्या कामाप्रति विश्वास वाढण्यास मदत झाली.- अजय गांडोळे, सरपंच, ग्रा.पं., पवनार

टॅग्स :Pavnarपवनार