शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

युवकांच्या सतर्कतेमुळे आगीपासून बचावले गांव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 21:19 IST

भरदुपारी उन्हाच्या तीव्र झळा सुरु असल्याने गावातील रस्ते सामसूम झाले होते. अशातच गावालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्यांने अचानक पेट घेतला. उन्हाचा तडाख्यात हवेची झुळूक आल्याने आगीने रौद्ररुप धारण केले.

ठळक मुद्देजाम येथील घटना : मोकळ्या जागेवरील कचऱ्याने घेतला पेट

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : भरदुपारी उन्हाच्या तीव्र झळा सुरु असल्याने गावातील रस्ते सामसूम झाले होते. अशातच गावालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्यांने अचानक पेट घेतला. उन्हाचा तडाख्यात हवेची झुळूक आल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. ही आग गावाच्या दिशेने सरकू लागली. याकडे गावातील सरपंच व युवकांचे लक्ष गेल्याने त्यांनी लागलीच धाव घेत गावाला आगीपासून वाचविले. ही घटना तालुक्यातील जाम येथे मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.जाम गावाच्या मागच्या बाजुस मोठ्या प्रमाणात पडिक जमिन व शेती आहे. त्या सर्व जमिनीवर वाळलेला कचरा पडलेला आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक या कचºयाने पेट घेतला. हवेमुळे या आगीचा चांगलाच भडका उडाला. ही आग झपाट्याने गावाकडे येऊ लागली. सरपंच सचिन गावंडे यांना या आगीची माहिती मिळताच त्यांनी काही ग्रामपंचायत सदस्य व युवकांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. आगीमुळे होणारे नुकसान लक्षात घेता मिळेत त्या साधनांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.दरम्यान हिंगणघाट येथून अग्निशमन दलाला प्राचारण करण्यात आले. तेही उशिरा पोहोचल्याने आग गावापर्यंत आली होती. पण, आगीला गावापासून दूर लोटण्यात युवक यशस्वी झाले. नंतर अग्निशमक दलानेही पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळविले. सरपंच, सदस्य व युवकांच्या या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता पोलीस उपनिरिक्षक मिलिंद पारडकर, अरविंद येनुरकर, रवि पुरोहित, वैभव चरडे, तलाठी ढवळे, महादेव बैलमारे, प्रमोद चौखे, अक्षय फुकट, राहुल पाटील, अजय खेडेकर, मोहन सराटे यांच्यासह नागरिकांनी सहकार्य केले.

टॅग्स :fireआग