शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पाण्यासाठी ग्रामस्थ संतापले

By admin | Updated: May 23, 2017 01:04 IST

येथील काकडदरा पुनर्वसन ग्रामपंचायतीवर पाणी पुरवठा योजनेचे ९ लाख २८ हजार ३० रुपयांचे देयक थकले आहे.

थकित देयकापोटी कापली वीज : ग्रा.पं.च्या मासिक सभेत गदारोळलोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पं.) : येथील काकडदरा पुनर्वसन ग्रामपंचायतीवर पाणी पुरवठा योजनेचे ९ लाख २८ हजार ३० रुपयांचे देयक थकले आहे. या थकबाकीपोटी महावितरणने योजनेचा पाणी पुरवठा खंडित केला आहे. यामुळे गत आठ दिवसांपासून गावात कृत्रिम पाणी पुरवठा निर्माण झाला असून गावाकऱ्यांची भटकंती होत आहे. हा त्रास टाळण्याकरिता देयकाची रक्कम भरण्याची मागणी करीत गावकऱ्यांनी सोमवारी आयोजित सभेवर धडक देत सरपंच व सदस्यांना धारेवर धरले. सविस्तर वृत्त असे की, काकडदरा ग्रा.पं. पुनर्वसीत ग्रा.पं. असून लोकसंख्या साधारणत: १ हजारावर आहे. ग्रामपंचायतीची स्थापना झाली तेव्हापासून काकडदरा पुनर्वसन व रामदरा पुनर्वसन या दोन्ही गावाची ग्रामपंचायती एकत्र होत्या. सन २००९ पासून रामदरा पुनर्वसन ग्रा.पं. ची पाणी पुरवठा वेगळा व स्वतंत्र झाला. परंतु सदर थकित वीज देयक हे दोन्ही गावची ग्रा.पं. एकत्र होती तेव्हापासूनचे आहे. तर सदर विद्युत कनेक्शन हे जि.प.च्या नावाने आहे. सदर देयक हे त्यावेळेस काकडरा ग्रा.पं. एकत्र असल्यामुळे संपूर्ण थकित विद्युत बिलाची राशी एकूण ९,२८,०३० आहे. एप्रिल २०१७ पर्यंत ही पुरवठा योजना ग्रा.पं. काकडदराच्या नावाने आहे. या अगोदरही अनेकवेळा अशा प्रकारे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. यावेळी पाणी पुरवठा, सामान्य फंड तंटामुक्ती व १४ वा वित्त आयोग इत्यादीच्या फंडातून काही विद्युत देयक भरून विद्युत पुरवठा पुर्ववत झाला होता. याच प्र्रकारे १४ व्या वित्त आयोगातून थकित देयकापैकी काही रक्कम भरून विद्युतपुरवठा सुरू करून घ्यावा, असी सूचना ग्रा.पं. सदस्य सुरेश खरे, विद्या परणकर, विमल पखाले यांनी सरपंच निता वडुरकर व सचिवांना केली. गटविकास अधिकारी आष्टी यांनी सुद्धा १४ व्या वित्त आयोगातून सदर विद्युत बिलाची काही रक्कम भरून विद्युत पुरवठा सुरू करून घ्यावा, अशी सूचना केली होती. परंतु यावर कुठलीही कार्यवाही झाल नाही. यामुळे देयक अदा करून गावातील पाणी पुरवठा पुर्ववत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सामान्य फंडात निधी उपलब्ध नसून काही तडजोड करून सुरू महिन्याचे देयक व अधिकचे असे एकूण २० हजार भरण्यास तयार असून त्याबाबत विद्युत मडळाच्या सहायक अभियंता यांची भेट घेवून काही तडजोड करून विद्युत पुरवठा सुरू होण्याबाबत प्रयत्न करतो.- आर. बी. घोटकर, सचिव, ग्रा.पं. काकडदरा पुनर्वसनगटविकास अधिकारी यांनी सदर पाणीपुरवठ्याचे विद्युत बिल १४ व्या वित्त आयोगातून भरावे, असे आदेश दिले आहे. त्याबाबत तसी सुचना सचिव ग्रा.पं. काकडदरा यांना केली आहे.- पी.एस. चव्हाण, विस्तार अधिकारी पं.स. आष्टी.