शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

महावितरणविरूद्ध ग्रामस्थांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:49 IST

महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे सध्या ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याविरूद्ध एकत्र येथे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर धडक देत थेट जनता दरबारच भरविला. याप्रसंगी वीज पुरवठ्यातील होणाऱ्या त्रासाबाबत रोष व्यक्त करीत कनिष्ठ अभियंता तुमडाम यांची त्वरित बदली करावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी लावून धरली.

ठळक मुद्देग्रामपंचायत कार्यालयात भरविला जनता दरबार

लोकमत न्यूज नेटवर्कमांडगाव : महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे सध्या ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याविरूद्ध एकत्र येथे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर धडक देत थेट जनता दरबारच भरविला. याप्रसंगी वीज पुरवठ्यातील होणाऱ्या त्रासाबाबत रोष व्यक्त करीत कनिष्ठ अभियंता तुमडाम यांची त्वरित बदली करावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी लावून धरली. एवढ्यावरच थांबले नाही तर उपसरपंचाने समस्या निकाली न निघाल्यास राजीनामा देऊ, असा इशाराच देऊन टाकला. ग्रामस्थांच्या या एल्गारामुळे गावात पूरता गोंधळ निर्माण झाला होता.मांडगाव येथील नागरिक, शेतकरी यांना विद्युत पुरवठ्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत कनिष्ठ अभियंत्यांकडे तक्रारी करण्यात आल्या; पण दोन वर्षांपासून त्याकडे दुर्लक्ष करीत कनिष्ठ अभियंता पानटपरीवरच वेळ घालवित असल्याचा आरोप नागरिकांनी याप्रसंगी केला. शिवाय त्यांच्या उद्धट स्वभावामुळे ते परिसरात प्रसिद्ध झाले आहेत. जनता दरबारात शेतकरी व ग्रामस्थांच्या समस्या सरपंच सविता डडमल यांनी जाणून घेतल्या. वीज कंपनीच्या हलगर्जीचा त्यांनाही सामना करावा लागला असून दोन रात्र काळोखात राहावे लागले. आपल्याला कनिष्ठ अभियंत्याने अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार सरपंचांनी केली. उपसरपंच प्रमोद डफ यांनी नाराजी व्यक्त करीत जर या समस्या निकाली निघाल्या नाही तर पदाचा राजीनामा देऊ, अशा भाषेत सुनावले. पं.स. सदस्य सुनील डुकरे यांच्याकडे दररोज चार ते पाच तक्रारी येतात. याबाबत त्यांनी अभियंत्याशी चर्चाही केली; पण तक्रारी दूर झाल्या नाहीत. अभियंत्याने प्रत्येक तक्रारकर्त्यासोबत व्यवस्थित बोलावे. कामात सुधारणा करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. शेतकºयांनीही आपापल्या समस्या यावेळी मांडल्या.वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराने ग्रा.पं. चा पाणीपुरवठा प्रभावित होत आहे. ग्रा.पं. साठी स्वतंत्र स्वीच लाईट लावण्याबाबत सहा महिन्यांपूर्वी खुद्द आमदारांनी सांगितले होते; पण त्याची चौकशीही केली नाही. लता बानाईत १५ दिवसांपासून अंधारात आहे. तक्रार देऊनही कार्यवाही न झाल्याने खासगी व्यक्तीला पैसे देत दुरूस्ती करून घ्यावी लागली. ओलित सुरू असताना वीज जोडणी कापल्याची तक्रार ज्ञानेश्वर वरवटकर यांनी केली. गावातील डीपी दुरवस्थेत आहेत. सर्व डीपीचे मेन्टनन्स गरजेचे आहे. या सर्व बाबींवर चर्चा करून अभियंता बदलण्याचा ठराव पारित करण्यात आला. यावेळी मनोहर पिसे, नारायण पाहुणे, प्रकाश पाहुणे, विजय कुंभलकर, सुनील तडस यासह सर्व ग्रामस्थांनी तक्रारी केल्या.३० जूनपर्यंत सर्व समस्या दूर करणार -अधीक्षक अभियंताग्रामस्थांचा रोष पाहून अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे गावात दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढत समस्या निकाली काढण्याकरिता उपाययोजना सुचविल्या. कनिष्ठ अभियंत्यांची पदे रिक्त असल्याने पद रिकामे ठेवण्यापेक्षा नवीन नारखेडे यांना ३० तारखेपर्यंत सर्व समस्या दूर करा, अशा सूचना दिल्या. ग्रा.पं. मध्ये तक्रारीसाठी दोन रजिस्टर द्यावे, आठवड्यातून आढावा घ्यावा, एक लाईनमन नियुक्त करून त्याचे नाव, मोबाईल क्रमांकच्या फलकावर लावण्याच्या सूचना दिल्या. ३० जूनला आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पावडे उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीज