शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

राज्यात सर्वाधिक मताधिक्याचा हिंगणघाट मतदार संघात विक्रम

By admin | Updated: October 19, 2014 23:59 IST

विधानसभा निवडणुकीत हिंगणघाट मतदार संघात भाजपाचे उमेदवार समीर कुणावार यांनी प्रतिस्पर्धांच्या जमानती जप्त करून अभूतपूर्व विजय मिळविला. त्यांना ९० हजार २७५ मते मिळाली असून

वर्धा : विधानसभा निवडणुकीत हिंगणघाट मतदार संघात भाजपाचे उमेदवार समीर कुणावार यांनी प्रतिस्पर्धांच्या जमानती जप्त करून अभूतपूर्व विजय मिळविला. त्यांना ९० हजार २७५ मते मिळाली असून बसपाच्या प्रलय तेलंग यांचा त्यांनी ६५ हजार २३२ मतांनी पराभव केला. त्यांचे मताधिक्य राज्यात सर्वाधिक असावे.या निवडणुकीत एकूण १ लाख ८७ हजार ८६१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पोस्टल मतदान ९८९ असून ९५१ मतदारांनी नोटाचा वापर केला़ सकाळी ८ वाजता मतमोजणीस सिंदी रेल्वेपासून प्रारंभ होऊन पहिल्या फेरीतच कुणावार यांनी राकाँचे राजू तिमांडे यांच्यावर ३ हजार ८८४ मतांची आघाडी घेतली़ २४ व्या फेरीत ही आघाडी ६५ हजार २३२ मतांवर पोहोचली़ मनसे उमेदवार अतुल वांदीले यांना ७ हजार ३१०, शिवसेनेचे अशोक शिंदे २१ हजार ५२३, काँग्रेसच्या उषाकिरण थुटे १२ हजार ५५०, बसपाचे प्रलय तेलंग २५ हजार १००, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू तिमांडे २३ हजार ८३, रिपाइंचे डॉ. मोरेश्वर नगराळे ३६५, बमुपाच्या लता थूल ३६८, गोंगपाचे विनोद उईके ६५६, अपक्ष किसना व्यापारी १ हजार ११२, गजानन सोनवणे ९०४, गजू कुबडे १ हजार ५९८, जगन्नाथ राऊत ५१५ व प्रवीण उपासे यांना १ हजार ४५६ मते मिळाली.एकूण १ लाख ८७ हजार ८६१ मतदानाच्या सहाव्या भागाची म्हणजे ३१ हजार ३१० मते १३ ही उमेदवारांना घेता आली नाही. शिवसेनेचे शिंदे यांची ही सहावी निवडणूक असून १९८९ मध्ये त्यांनी २३ हजार ८३० मते घेतली होती़ राकाँचे माजी आ़ राजू तिमांडे यांची चौथी निवडणूक होती. यंदा दोघांना मिळालेली मते आतापर्यंतची त्यांची सर्वात कमी मते आहेत.पहिल्या फेरीनंतरच भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. दुपारी ४ वाजता बीसीसी ग्राऊंडवरून कुणावार यांची विजयी मिरवणूक निघून त्यांच्या घरी पोहोचली़ यंदा पहिल्यांदाच येथे भाजपचे कमळ फुलले़ मिरवणुकीत नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे, वसंत आंबटकर, रमेश धारकर, प्रेम बसंतानी, किशोर दिघे, श्याम भिमनवार, शंकर यंकेश्वर, राजेश शेंडे आदींसह मतदार कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी घनश्याम भूगांवकर तर तहसीलदार दीपक करंडे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला होता.(तालुका प्रतिनिधी)