शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

२ जानेवारीपासून विदर्भ राज्य निर्माण यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 20:16 IST

आगामी २०१९ च्या निवडणुकीपूर्वी विदर्भ द्या, अन्यथा विदर्भातून चालते व्हा, खुर्च्या खाली करा यासाठी जनजागरण करण्यासाठी २ ते १२ जानेवारीपर्यंत संपूर्ण विदर्भभर विदर्भ राज्य निर्माण यात्रा विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे काढण्यात येणार आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी बुधवारी २६ डिसेंबरला विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देराम नेवले : विश्रामगृहातील पत्रपरिषदेत दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आगामी २०१९ च्या निवडणुकीपूर्वी विदर्भ द्या, अन्यथा विदर्भातून चालते व्हा, खुर्च्या खाली करा यासाठी जनजागरण करण्यासाठी २ ते १२ जानेवारीपर्यंत संपूर्ण विदर्भभर विदर्भ राज्य निर्माण यात्रा विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे काढण्यात येणार आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी बुधवारी २६ डिसेंबरला विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.यात्रा २ जानेवारीला नागपूर येथील गांधी पुतळा, सीताबर्डी येथून गांधी पुतळ्याला माल्यार्पण करून दुपारी ११ वाजता छोटेखानी सभा होऊन एक विदर्भ निर्माण यात्रा पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या सहा जिल्ह्यांत फिरून १२ जानेवारीला नागपूरला परत येईल. तर दुसरी विदर्भ निर्माण यात्रासुद्धा २ जानेवारीला नागपूरवरून निघून पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ या पाच जिल्ह्यांतून फिरून १२ जानेवारीला नागपूरला परत येईल व दोन्ही यात्रा १२ जानेवारीला नागपूरला परत येऊन दुपारी १ वाजता नागपूरला समारोपीय सभा होईल.या दोन्ही यात्रेदरम्यान १०० लहान मोठ्या सभा करून विदर्भासाठी जनजागरण करण्यात येईल व भाजपचे वैदर्भीय जनतेला कसे फसविले, हा संदेश जनतेच्या दारापर्यंत पोहोचविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी अ‍ॅड. वामनराव चटप, माजी आमदार सरोजताई काशिकर, मधुसूदन हरणे, गजानन निकम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.अ‍ॅड. चटप म्हणाले, खोटे आश्वासन दिले त्याबद्दल येत्या निवडणुकीत भाजपला वैदर्भीय जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. म्हणून येत्या २०१९ च्या निवडणुकीत विदर्भातील सर्वच विदर्भवादी पक्ष, संघटना यांनी एकत्र येऊन विदर्भ राज्य निर्माण करणे हा संकल्प करून निवडणूका एकत्र लढण्याचे ठरविले आहे. यापूर्वी काँग्रेस व आता सत्तेत असलेला भाजपा हे दोन्ही पक्ष विदर्भ देण्यास असमर्थ ठरले आहत्ो. त्यांच्या या नाकर्तेपणाविरूद्ध सर्व विदर्भवाद्यांनी एकजूट होऊन विदर्भ निर्माण महामंच तयार केला आहे. आगामी निवडणुकीत या दोन्ही पक्षांना त्यांच्या नाकर्तेपणाचा धडा शिकविण्यात येणार आहे.विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ माझा, आम आदमी पक्ष, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, शेतकरी संघटना बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष, रिपलब्लिकन पार्टी, जांबुवंतराव धोटे विचारमंच, राष्ट्रीय जन सुराज्य पार्टी, नाग विदर्भ आंदोलन समिती आदी विदर्भातील सर्व विदर्भवादी पक्ष विदर्भवादी संघटना यांचे नेते व प्रतिनिधी यांची एक संयुक्त बैठक २७-२८ नोव्हेंबर २०१८ ला नागपूरला रवीभवन येथे पार पडली. या विदर्भवादी संघटनांनी एकत्र येऊन येत्या निवडणुका विदर्भ निर्माण महामंचचे गठन करून या बॅनरखाली लढविण्याचे ठरविण्यात आले असल्याचे सांगतानाच संकल्प विदर्भ निर्मितीचा हे घोषवाक्य ठरविण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.सर्वच पक्ष व संघटना यांचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवून विदर्भ राज्य निर्माण हे एकमेव लक्ष ठरविण्यात आले आहे. त्यासाठी विदर्भ निर्माण महामंच या नावाखाली येत्या लोकसभा व विधानसभा लढविण्यात येणार आहेत, असे सरतेशेवटी बोलताना त्यांनी सांगितले.