शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ शकुंतला रेल्वे मुक्ती समितीला यश

By admin | Updated: February 13, 2017 00:45 IST

पुलगाव ते आर्वी नॅरोगेज शकुंतला रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचा उल्लेख रेल्वे अंदाजपत्रकाच्या पिंक बुकमध्ये करण्यात आला आहे.

रोहणा : पुलगाव ते आर्वी नॅरोगेज शकुंतला रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचा उल्लेख रेल्वे अंदाजपत्रकाच्या पिंक बुकमध्ये करण्यात आला आहे. विदर्भातील तीनही नॅरोगेज शंकुतला रेल्वे मार्गाची ब्रिटीश कंपनीच्या ताब्यातून मुक्त होवून या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हावे म्हणून विदर्भ शकुंतला रेल्वे मुक्ती व विकास कृती समिती रोहणा यांच्यावतीने गत १७ वर्षांत विविध आंदोलनाचे मार्ग अवलंबिले होते. आंदोलनादरम्यान राष्ट्रपती, पंतप्रधान व रेल्वे मंत्री यांना पाच-पाच रुपयांचे मनीआॅर्डर पाठविणे, विद्यार्थ्यांकरवी पोस्टकार्ड पाठविणे, केंद्रीय गृह राज्यमंत्री यांच्याकरवी प्रयत्न करणे, आर्वी येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण, रोहणा येथे २२ दिवसीय साखळी उपोषणही करण्यात आले. अलिकडे १०० किलोमिटर रेल्वे मिशन स्थापन करून या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही एका शिष्टमंडळाने सदर प्रश्नाची तिव्रता समजावून सांगितली. येथील लोकप्रतिनिधी यांनी ही समस्या जबरदस्त लावून धरत चर्चा घडवून आणली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही अर्थसंकल्पात याला मंजुरी प्रदान केली. विदर्भ शकुंतला रेल्वे मुक्ती व विकास कृती समितीचे बाबासाहेब गलाट, अनिल देवतळे, प्रा. मिसाळकर, प्रकाश टाकळे व जनमंचचे फनिन्द्र रघाटाटे, दिलीप पांडे, रोहणाचे सरपंच सुनील वाघ यांनी प्रयत्न केले. ‘शकुंतलेचा मुक्ती लढा’ या आशयाचे पुस्तक प्रकाशीत करणार असल्याची माहिती देण्यात आली. (वार्ताहर)