शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात बससाठी ४८ शालेय विद्यार्थी रात्री ९.३० पर्यंत रस्त्यावर ताटकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 12:02 IST

आष्टी शहीद तालुक्यातील आबाद किन्ही-भोई-मुबारकपूर या गावाला संध्याकाळी ५ वाजता जाणारी बस रात्री ९.३० आल्याने थंडीच्या दिवसात शालेय विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागल्याची घटना येथे मंगळवारी संध्याकाळी घडली.

ठळक मुद्देबस चार तास उशीराविद्यार्थ्यांनी बसस्थानकावर केले आंदोलन

आॅनलाईन लोकमतवर्धा: आष्टी शहीद तालुक्यातील आबाद किन्ही-भोई-मुबारकपूर या गावाला संध्याकाळी ५ वाजता जाणारी बस रात्री ९.३० आल्याने थंडीच्या दिवसात शालेय विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागल्याची घटना येथे मंगळवारी संध्याकाळी घडली. या प्रकाराने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आष्टी बस स्थानकात आंदोलन केले व वरिष्ठांसोबत बोलणी झाल्यानंतर ही बस रवाना झाली.वर्धा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी बससेवेवरच अवलंबून असतात. मात्र ही बससेवा त्यांच्यासाठी दिवास्वप्न ठरत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून बसेसच्या नियमित फेऱ्या कमी झाल्या आहेत, तर काही बसेसच बंद आहेत. याचा कडेलोट मंगळवारी संध्याकाळी झाला.शाळा सुटल्यावर आबादकिन्ही, मोई व मुबारकपूर येथील ४८ विद्यार्थी आष्टीच्या बसस्थानकावर चार तास ताटकळत उभे होते. तेथे लाईट नाही, महिलांकरिता शौचालय नाही, पिण्याच्या पाण्याची सोयही नाही, सगळीकडे घाणीचेच साम्राज्य आहे. अशा ठिकाणी हे विद्यार्थी शाळेतून सुटून चार साडेचार तास बसून होते. या परिसरात डासांचाही मोठा प्रादुर्भाव आहे.संध्याकाळचे सात वाजले तरी बस आली नाही हे पाहून विद्याथ्यांनी तेथेच आंदोलन सुरू केले. याची माहिती मिळताच राष्ट्रीय विद्यालयाचे प्राचार्य अनिल वानखेडे यांनी परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांशी बोलणे केले व त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यानंतर रात्री ९.३० च्या सुमारास बस आली व हे विद्यार्थी आपापल्या गावाकडे रवाना झाले.

टॅग्स :educationशैक्षणिक