माणिकवाडा गावातील प्रकार : आष्टी पोलिसांचे दुर्लक्ष; अधीक्षकांना निवेदनआष्टी (श.) : माणिकवाडा गावात गावठी मोहा दारूच्या भट्ट्या खुलेआम सुरू आहे. दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले. अखेर गावात महिला मंडळ स्थापन करून दारुविक्रेत्यांवर कारवाईला सुरुवात झाली. दारू पकडून भट्ट्या उद्धवस्त केल्या; पण दारुविक्रेत्यांकडून महिलांना अर्वाच्च शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार सुरू झाला. याकडे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे. माणिकवाडा गावात दोन विशिष्ट समाजाच्या लोकांनी दारूविक्रीला खुलेआम सुरूवात केली. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असल्याने अमरावती व नागपूर जिल्ह्यातून दारूची आयात केली जाते. सोबतच गावठी मोहाची दारू भट्टी लावून उत्पादन केले जाते. दररोज २५ ते ३० हजारांची दारू विकली जाते. दारूमुळे शेकडो संसार उद््ध्वस्त झाल्याने गावातील महिला मंडळ व तरूणांनी एकत्र येत दारू नष्ट करण्याचे ठरविले; पण आष्टी पोलीस ठाण्याचे कर्मचारी दारूविक्रेत्यांच्या पाठीशी असल्याने कारवाई करणे शक्य होत नव्हते. यासाठी महिलांनी स्वत:च दारूच्या भट्ट्या पकडायला सुरुवात केली. याला तीव्र विरोध सुरू आहे. जीवाची पर्वा न करता महिला मंडळ सक्रीय झाले आहे.दारूविक्रेत्यांविरूद्ध पोलिसांनी कारवाई करावी म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही निवेदन देण्यात आले. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना कारवाईचे आदेश दिले आहेत. असे असले तरी माणिकवाडा गावात अध्याप पोलीस पोहोचले नसल्याचेच दिसते. परिणामी, दारूविक्रेत्यांचे मनोबल उंचावले आहे. काही दिवसांपूर्वी दारूबंदी महिला मंडळाच्या सदस्यांच्या अंगावर एका समाजाचे तरूण चालून गेले होते. त्यांनी काठ्यांचा धाक दाखवित शिवीगाळ केली. अंगावर धावत जाऊन मारहाण केली. यामुळे गावात तणावाचे वातावरण आहे. महिलांनी पोलीस प्रशासनाचा निषेध केला असून दारूविक्रेत्यांकडून हफ्ते खाण्यात पोलीस व्यस्त असल्याने दारूबंदीला सहकार्य करीत नसल्याचा आरोप केला. नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार, अशी माहितीही दारुबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षांनी दिली. माणिकवाडा हे गाव अति संवेदनशील आहे. दोन महिन्यांपूर्वी झेंडा काढल्याचे प्रकरण झाल्याने पोलीस बंदोबस्त आहे. यातच दारूबंदी महिला मंडळावर हल्ला होऊ शकतो. याविरुद्ध पोलीस कारवाई गरजेची आहे. पोलिसांनी राडा होण्यापूर्वी नियंत्रण मिळविणे गरजेचे झाले आहे.(प्रतिनिधी)आष्टी (श.) : माणिकवाडा गावात गावठी मोहा दारूच्या भट्ट्या खुलेआम सुरू आहे. दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले. अखेर गावात महिला मंडळ स्थापन करून दारुविक्रेत्यांवर कारवाईला सुरुवात झाली. दारू पकडून भट्ट्या उद्धवस्त केल्या; पण दारुविक्रेत्यांकडून महिलांना अर्वाच्च शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार सुरू झाला. याकडे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे. माणिकवाडा गावात दोन विशिष्ट समाजाच्या लोकांनी दारूविक्रीला खुलेआम सुरूवात केली. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असल्याने अमरावती व नागपूर जिल्ह्यातून दारूची आयात केली जाते. सोबतच गावठी मोहाची दारू भट्टी लावून उत्पादन केले जाते. दररोज २५ ते ३० हजारांची दारू विकली जाते. दारूमुळे शेकडो संसार उद््ध्वस्त झाल्याने गावातील महिला मंडळ व तरूणांनी एकत्र येत दारू नष्ट करण्याचे ठरविले; पण आष्टी पोलीस ठाण्याचे कर्मचारी दारूविक्रेत्यांच्या पाठीशी असल्याने कारवाई करणे शक्य होत नव्हते. यासाठी महिलांनी स्वत:च दारूच्या भट्ट्या पकडायला सुरुवात केली. याला तीव्र विरोध सुरू आहे. जीवाची पर्वा न करता महिला मंडळ सक्रीय झाले आहे.दारूविक्रेत्यांविरूद्ध पोलिसांनी कारवाई करावी म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही निवेदन देण्यात आले. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना कारवाईचे आदेश दिले आहेत. असे असले तरी माणिकवाडा गावात अध्याप पोलीस पोहोचले नसल्याचेच दिसते. परिणामी, दारूविक्रेत्यांचे मनोबल उंचावले आहे. काही दिवसांपूर्वी दारूबंदी महिला मंडळाच्या सदस्यांच्या अंगावर एका समाजाचे तरूण चालून गेले होते. त्यांनी काठ्यांचा धाक दाखवित शिवीगाळ केली. अंगावर धावत जाऊन मारहाण केली. यामुळे गावात तणावाचे वातावरण आहे. महिलांनी पोलीस प्रशासनाचा निषेध केला असून दारूविक्रेत्यांकडून हफ्ते खाण्यात पोलीस व्यस्त असल्याने दारूबंदीला सहकार्य करीत नसल्याचा आरोप केला. नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार, अशी माहितीही दारुबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षांनी दिली. माणिकवाडा हे गाव अति संवेदनशील आहे. दोन महिन्यांपूर्वी झेंडा काढल्याचे प्रकरण झाल्याने पोलीस बंदोबस्त आहे. यातच दारूबंदी महिला मंडळावर हल्ला होऊ शकतो. याविरुद्ध पोलीस कारवाई गरजेची आहे. पोलिसांनी राडा होण्यापूर्वी नियंत्रण मिळविणे गरजेचे झाले आहे.(प्रतिनिधी)माणिकवाडा गावात दारूची सर्रास विक्री केली जात आहे. याविरूद्ध दारूबंदी महिला मंडळाने आवाज उठविला असून अनेक दारूभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. यामुळे दारूविक्रेत्यांनी महिलांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्ष पद्मा राऊत यांनी आष्टी पोलीस ठाण्यात गुरूवारी सकाळी तक्रार दाखल केली. या तक्रारीवर सायंकाळपर्यंतही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. आष्टी पोलिसांकडून माणिकवाडा येथील दारूविक्रेत्यांवर कारवाईही केली जात नाही आणि दारूबंदी महिला मंडळाच्या तक्रारीवरून गुन्हेही दाखल केले जात नाहीत. यामुळे महिला त्रस्त झाल्या असून अधीक्षकांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
दारूबंदीच्या महिलांवर विक्रेत्यांचे हल्ले
By admin | Updated: November 13, 2015 02:05 IST