आकोली : महाकाळी ते मासोद या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. हा रस्ता अरूंद असून जंगलव्याप्त आहे. त्यामुळे रस्त्याचे टप्प्या-टप्प्याने डांबरीकरण करावे, असे निर्देश होते. मात्र कंत्राटदाराने या निर्देशाला झुगारत एकाचवेळी दोन्ही बाजूचे डांबरीकरण सुरू केले. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यात एक तासाकरिता मासोद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. कारंजाकडून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना यामुळे तासभर ताटकळावे लागले. काही वाहन चालकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली.(वार्ताहर) पूर्वसूचनाही दिली नाही४कंत्राटदाराने खरांगणा टी-पॉर्इंट व बांगडापूर मार्गावर सूचना फलक लावुन वाहनचालकांना याबाबत सजग करणे गरजेचे होते. यामुळे वाहनचालकांनी अन्य मार्गाने वाहने वळविली असती. मात्र सूचना दिली नसल्याने वाहन धारकांना मनस्ताप सहन करावा लागला. खरांगणाकडून कारंजाकडे जाणाऱ्या वाहनांच्या रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्या लागल्या होत्या.
महाकाळी घाटात वाहनांच्या रांगा
By admin | Updated: January 4, 2016 04:23 IST