शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणारे वाहन दुभाजकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 05:00 IST

भरधाव वाहन अल्लीपूर येथील यशवंत शाळेजवळ आले असता वाहनाचे स्टेअरिंग अचानक लॉक झाले. दरम्यान, अनियंत्रित झालेले हे वाहन थेट रस्ता दुभाजकावर चढत पथदिव्यांच्या खांबावर धडकले. या अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी झाला असून, पथदिव्याचे, तसेच अपघातग्रस्त वाहनाचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. अपघात होताच वाहन मालकाने तातडीने दुसरे वाहन बोलावून अपघातग्रस्त वाहन घटनास्थळावरून पसार केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाचे अचानक स्टेअरिंग लॉक झाले. अशातच अनियंत्रित झालेले वाहन रस्ता दुभाजकावर चढत थेट पथदिव्यांच्या खांबावर धडकले. यात वाहन चालक किरकोळ जखमी झाला असला तरी या घटनेमुळे अल्लीपुरात विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक केली जात असल्याचे उजेडात आले आहे. हा अपघात शुक्रवारी अल्लीपूर शिवारातील यशवंत शाळेजवळ सकाळी ८.१५ वाजेच्या सुमारास झाला.कोविड संसर्ग नसल्यामुळे शाळा, महाविद्यालये विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहेत. अशातच उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून विद्यार्थी वाहतुकीसाठी कुठलाही परवाना नसलेले एक चारचाकी वाहन शाळकरी मुलांना शाळेत साेडून दिल्यानंतर परतीचा प्रवास करीत होते. भरधाव वाहन अल्लीपूर येथील यशवंत शाळेजवळ आले असता वाहनाचे स्टेअरिंग अचानक लॉक झाले. दरम्यान, अनियंत्रित झालेले हे वाहन थेट रस्ता दुभाजकावर चढत पथदिव्यांच्या खांबावर धडकले. या अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी झाला असून, पथदिव्याचे, तसेच अपघातग्रस्त वाहनाचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. अपघात होताच वाहन मालकाने तातडीने दुसरे वाहन बोलावून अपघातग्रस्त वाहन घटनास्थळावरून पसार केले. त्यामुळे विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्यांना कुण्या राजकीय पुढाऱ्याचा आशीर्वाद तर नाही ना, अशी चर्चा परिसरात होत आहे. अल्लीपूर पोलिसांनी विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्याची गरज आहे.

विद्यार्थी थोडक्यात बचावले-    जर अपघाताच्या वेळी वाहनात विद्यार्थी असते तर विद्यार्थी नक्कीच जखमी झाले असते अशी चर्चा घटनास्थळ होती. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी भरधाव वाहनात विद्यार्थी नसल्याने ते थोडक्यात बचावले. असे असले तरी या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

 

टॅग्स :Accidentअपघात