शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आगीवर नियंत्रणासाठी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 21:40 IST

आगीच्या घटनांना वेळीच आळा घालता यावा याकरिता वनविभागाकडून हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मात्र, जंगलाला आगीच्या घटना वगळता धुऱ्याला लागणाºया आगीच्या घटनांचेच प्रमाण अधिक असून याबाबतही मोबाईलवर संदेश प्राप्त होत असल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात धुऱ्यांना आग लागण्याचे प्रमाण अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आगीच्या घटनांना वेळीच आळा घालता यावा याकरिता वनविभागाकडून हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मात्र, जंगलाला आगीच्या घटना वगळता धुऱ्याला लागणाऱ्या आगीच्या घटनांचेच प्रमाण अधिक असून याबाबतही मोबाईलवर संदेश प्राप्त होत असल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे.उन्हाळ्यात जंगलात आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी भारतीय वनसंरक्षण संस्थेच्या माध्यमातून (फॉरेस्ट सर्व्हे आॅफ इंडिया) वनविभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मोबाईलची संकेतस्थळावर नोंदणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात कुठेही आग लागताक्षणी या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईलवर संदेश प्राप्त होतो, तसेच ई-मेलदेखील येतो. संदेश मिळताच संबंधित भाग, बिटातील अधिकारी, कर्मचारी तात्काळ घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळवितात. १ जानेवारी २०१९ ते आतापावेतो जिल्ह्यात आगीच्या ४२ घटना घडल्यात. मात्र, यातील बहुतांश धुऱ्याला लागलेल्या आगीच्या घटना असून बोटावर मोजण्याइतपतच वणव्याच्या घटना आहेत.सॅटेलाइटवरून केवळ आग लागल्याचे दर्शविले जाते. मात्र, धुरा की जंगलाला आग लागली हे कळू शकत नाही. त्यामुळे कुठेही आग लागताच वनविभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना संदेश, ई-मेल प्राप्त होतो. अधिकारी, कर्मचारी धावपळ करीत घटनास्थळ गाठतात, यावेळी आग धुºयाची असल्याचे स्पष्ट होते.वनविभागात नियंत्रण कक्षआगीच्या घटनांची नोंद घेण्याकरिता वनविभागाच्या वतीने ‘फॉरेस्ट जीआयएस’ हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. याकरिता कार्यालयात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या विभागात एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला असून पोर्टल दोनवेळा अपडेट होते. या पोर्टलच्या नकाशावर आग लागल्याचे ठिकाण विशिष्ट रंगाद्वारे दर्शविले जाते. तसेच बिटाकरिता प्रत्येकी एक याप्रमाणे १९० फायर ब्लोअर आहेत.उन्हाळ्यात जंगल आणि शेतात आग लागण्याचे प्रमाण मोठे असते. या घटनांवर नियंत्रण मिळविण्याकरिता पोर्टल विकसित करण्यात आले असून १९२भ हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. नागरिकांना घटना घडल्यास यावर संपर्क करावा.-सुहास बढेकर, सहायक उपवनसंरक्षक, वनविभाग वर्धा.