शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त पार्किंग...बेपत्ता फुटपाथ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 23:33 IST

शहरातील विविध भागत बूट, चप्पल, कपडे, अन्नधान्यांसह फळविक्रेत्यांनी फुटपाथ मार्केटची सुरुवात केली आहे. शहरातील बजाज चौक, बॅचलर रोड, आर्वीनाका परिसर, वंजारी चौक आदी भागात मोठ्या प्रमाणात फुटपाथ मर्केट तयार झाले आहेत. तर शहरातील इतरही भागात असे फुटपाथ मार्केट तयार होत असताना याकडे मात्र, नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांना ना जागेचे भान, ना डिपॉझिट त्यामुळे  त्यांना दुकानाच्या तुलनेत कमी भावात वस्तू खरेदी करणे परवडते.

ठळक मुद्देवाहतूक नियमांची पायमल्ली : शिस्तीची जबाबदारी नागरिकांचीही

  लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहरातील अनेक परिसरात रस्त्यावरचे मार्केट तयार झाले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली असून पोलीस विभागासह नागरिकांची वाहतूक शिस्तीची जबाबदारी तेवढीच महत्त्वाची आहे. पोलिसांनीही बेशिस्त पर्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सर्व सामान्य नागरिकांतून करण्यात येत आहे. शहरातील विविध भागत बूट, चप्पल, कपडे, अन्नधान्यांसह फळविक्रेत्यांनी फुटपाथ मार्केटची सुरुवात केली आहे. शहरातील बजाज चौक, बॅचलर रोड, आर्वीनाका परिसर, वंजारी चौक आदी भागात मोठ्या प्रमाणात फुटपाथ मर्केट तयार झाले आहेत. तर शहरातील इतरही भागात असे फुटपाथ मार्केट तयार होत असताना याकडे मात्र, नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांना ना जागेचे भान, ना डिपॉझिट त्यामुळे  त्यांना दुकानाच्या तुलनेत कमी भावात वस्तू खरेदी करणे परवडते. मात्र, लाखो रुपये खर्च करुन दुकान थाटणाऱ्या व्यावसाियकांना याचा जबर फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. सोबतच शहरात जागोजागी अतिक्रमण केल्याने सर्वसामान्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. इतकेच नव्हेतर शहरात बेशिस्त वाहतुकीलाही उधाण आले आहे. मिळेल त्या जागेवर वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे किरकोळ अपघातही घडत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने वेळीच फुटपाथ मार्केट स्थायी होण्यापूर्वी यावर अंकुश लावण्याची गरज निर्माण झाली आहे. नाही तर फुटपाथ मार्केट शहरातील पादचाऱ्यांसह दुचाकी, चारचाकी चालकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

वाहतूक कोंडी झाली नित्याचीचअपुऱ्या जागेमुळे अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर दुकाने थाटली आहे. काहींकडून अर्ध्या रस्त्याचा बिनदिक्कत वापर केला जातो. बॅचलर रोड, मुख्य मार्ग, आर्वी नाक्याकडे जाणारा मार्ग, बॅचलर रस्त्यावरील बॅंकेसमोरील मार्ग, बजाज चौक आदी ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. इतकेच नव्हे तर निर्मल बेकरी समोरील रस्ता, महाराष्ट्र बॅंकेसमोरील रस्ता हा अरुंद असल्याने या मार्गाने ऐकरी वाहतूक करण्याचा आदेश होता. मात्र, आजघडीला या एकेरी मार्गावरुन सर्रास दोन्ही बाजूने वाहतुक होत असून वाहतुक कोंडी निर्माण होते. यामुळे सर्वसामान्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. 

फुटपाथ उरले नावालाच...शहरातील बहुतांश फुटपाथ हे विक्रेत्यांनी व्यापले आहेत. अनेक ठिकाणी फुटपाथवरच वाहने उभी केल्याचे दिसून येते. काही भागांत तर च्क्क रस्त्यावर वाहने उभी करण्यात येत असल्याचे दिसून येते.  

बेवारस वाहनांमुळे कोंडी वंजारी चौक, बॅचलर रोड, आर्वीनाका परिसर आदी ठिकाणी वाहने पार्क करण्यासाठी जागेची व्यवस्था नाही. परिणामी, अनेक जण आपली वाहने रस्त्यावरच उभी करत असल्याचे चित्र आहे. शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या एका बॅंकेपुढे पार्किंगची व्यवस्था नसल्याने बँकेत येणारे नागरक रस्त्याच्या मधात वाहने उभी करीत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Parkingपार्किंग