शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
2
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
3
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
4
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
5
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
6
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
7
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
8
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
9
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
10
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
11
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
12
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
13
धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार
14
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
15
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
16
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?
17
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
18
वीरेंद्र सेहवागची पत्नी करतेय बीसीसीआय अध्यक्षांना डेट? सोशल मीडियावर अफवांचं वादळ, तो फोटो ठरतोय कारण
19
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही
20
'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO)

गांधीजींच्या सर्वोदय विचाराला समजून घ्या!

By admin | Updated: February 21, 2016 01:30 IST

समानता आणि शोषणमुक्त समाज व्यवस्था गांधीजींच्या सर्वोदय विचारात आहे. प्रत्येक व्यक्तीला रोजगार उपलब्धतेसाठी कार्य आणि जगण्यासाठी शेती उत्पादने महत्वाची आहे.

राधा भट: अखिल भारतीय सर्वोदय महिला शिबिराला प्रारंभसेवाग्राम : समानता आणि शोषणमुक्त समाज व्यवस्था गांधीजींच्या सर्वोदय विचारात आहे. प्रत्येक व्यक्तीला रोजगार उपलब्धतेसाठी कार्य आणि जगण्यासाठी शेती उत्पादने महत्वाची आहे. श्रमिकांचे जीवन आदर्शव्रत असून श्रम करणारा आणि शिक्षित यांचे वेतन व मूल्य सारखे असावे असे बापू म्हणत. यातूनच समानता निर्माण होऊन अंहिसा आणि मूल्य रूजेल असे मत सर्व सेवा संघाच्या माजी अध्यक्ष राधा भट यांनी व्यक्त केले. येथील यात्री निवासमध्ये शनिवारपासून अखिल भारतीय सर्वोदय महिला शिबिराला प्रारंभ झाला. यावेळी अध्यक्ष्यस्थानावरून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर पवनार आश्रमच्या कालिंदी राजस्थानच्या आशा ब्रोथ्रा, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही, उषा पंडित उपस्थित होते. मान्यवरांनी बापू, विनोबा आणि जयप्रकाशा नारायण यांच्या प्रतिमेला सूतमाळ अर्पण केली. अन्य राष्ट्रांना आपण फार पुढे असल्याचे मानतो, पण वास्तवात पुढारलेल्या राष्ट्रात शोषण दिसून येते. हे थांबविण्यासाठी गांधीजींच्या सर्वोदय विचाराला समजून घ्यावे लागेल. असेही राधा भट यावेळी म्हणाल्या.जयवंत मठकर म्हणाले, महिलांनी सामाजिक कार्यात आपला सहभाग वाढविला पाहिजे. यातून सबलीकरण तर होणारच पण सशक्त समाज व्यवस्थाही निर्माण होईल. महादेव विद्रोही म्हणाले, गोवंश हत्या बंदीचा कायदा राष्ट्रीय स्तरावर होणे गरजेचे आहे. जाट आंदोलनातील संघर्षावरही त्यांनी विचार व्यक्त केले. कालिंदी बहन म्हणाल्या, करूणा, अंहिसा या मनोवृत्ती महिलांच्या अंत:करणातच असतात. कुटुंबालाच नव्हे तर राष्ट्राला सुस्थितीत नेण्याची ताकद स्त्रीमध्ये आहे. त्यामुळे स्त्रियांनी या गुणांचा राष्ट्र व विश्वहितासाठी उपयोग करावा असे त्या म्हणाल्या. शिबिराचे संचालन व आभार शोभा डोणगावकर यांनी केले. महाराष्ट्र, गुजरात, आसाम, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व राजस्थान या राज्यातील ६० महिला या शिबिरात सहभागी झाल्या आहेत.(वार्ताहर)