शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सेलू तालुक्यात तीन गावांकरिता एकच जलकुंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 23:42 IST

सेलू तालुक्यातील कान्हापूर गटग्रामपंचायतीमध्ये गोंदापूर, गणेशपूर ही गावे येतात. या तिन्ही गावांसाठी एकच जलकुंभ असून गणेशपूरचा पाणीपुरवठा बंदच आहे, तर कान्हापूरच्या शाळेत गत वर्षभरापासून विकतचे पाणी घ्यावे लागत असून यात मुख्याध्यापकाच्याच खिशाला झळ पोहोचत आहे.

ठळक मुद्देकान्हापूर शाळेत विकतचे पाणी : गणेशपूर वर्षभरापासून तहानलेलेच

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : सेलू तालुक्यातील कान्हापूर गटग्रामपंचायतीमध्ये गोंदापूर, गणेशपूर ही गावे येतात. या तिन्ही गावांसाठी एकच जलकुंभ असून गणेशपूरचा पाणीपुरवठा बंदच आहे, तर कान्हापूरच्या शाळेत गत वर्षभरापासून विकतचे पाणी घ्यावे लागत असून यात मुख्याध्यापकाच्याच खिशाला झळ पोहोचत आहे.या गावाची रचना ही यू आकाराची असून पाण्याचा जलकुंभ एका टोकावर आहे. एकाच जलकुंभातून कान्हापूर, गोंदापूर व गणेशपूर या गावांना पाणीपुरवठा केला जातो. तिन्ही गावे तहानलेली आहेत.पाण्यासाठी हातपंपावर रांगा लागलेल्या दिसतात. घरापासून लांब असलेल्या हातपंपावरून सायकलने पाणी आणावे लागत असून यात गृहिणींची चांगलीच फरपट होत आहे.याच गटग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या गणेशपूरला तर एक वर्षापासून पाणीपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांच्या घशाला कोरड पडली आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत नळ असूनही नळाला पाणी येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकरिता पाचशे रुपये महिन्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्याचे पैसे मुख्याद्यापकाला खिशातून अदा करावे लागत आहे. प्रशासनाने पाणीसमस्या सोडवावी, अशी मागणी आहे.म्हणे, प्रस्ताव अप्राप्त!वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव जुलै २०१८ मध्ये ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे पाठविण्यात आला होता, असे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे तर पाणीपुरवठा विभाग म्हणतो प्रस्ताव अप्राप्त आहे. त्यामुळे कुणाचे खरे, हे कळायला मार्ग नाही.शाळेत विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी पाहिजे, शिवाय शौचालयात वापरासाठी पाण्याची गरज आहे. पाणीपुरवठा ग्रामपंचायतीची नैतिक जबाबदारी ठरते, पण पाणी पुरवठा होत नसल्याने एक वर्षापासून पाचशे रुपये महिन्याने पाणी विकत घ्यावे लागत आहे.- गौतम सोनटक्के, मुख्याध्यापक जि.प.शाळा कान्हापूर.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई