शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा तालुक्यात भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 23:40 IST

तालुक्यात भीषण पाणी समस्या निर्माण झाली आहे. ज्या गावात दररोज पाणी येत होते, दरवर्षी पाण्याची समस्या उद्भवूनही तिसऱ्या दिवशी नळ यायचे. यावर्षी मात्र पाच ते सहा दिवसांनंतर नळ येत आहेत. शासनाने विहिरी, बोअरवेल अधिग्रहित केल्या असल्या तरी या विहिरी आणि बोअरवेलची पातळीदेखील खालावल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपाण्याकरिता मोजावे लागताहेत पैसे : बोअरवेल, विहिरींची जलपातळीही खालावली

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : तालुक्यात भीषण पाणी समस्या निर्माण झाली आहे. ज्या गावात दररोज पाणी येत होते, दरवर्षी पाण्याची समस्या उद्भवूनही तिसऱ्या दिवशी नळ यायचे. यावर्षी मात्र पाच ते सहा दिवसांनंतर नळ येत आहेत. शासनाने विहिरी, बोअरवेल अधिग्रहित केल्या असल्या तरी या विहिरी आणि बोअरवेलची पातळीदेखील खालावल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. काही गावात दुसरी विहीर किंवा बोर अधिग्रहण करण्याची शासनाची तयारी असल्याची बोेलले जात आहे.तालुक्यातील बोंदरठाणा येथे तर भीषण पाणी समस्या असून अधिग्रहण केलेल्या विहिरीचे पाणी अपुरे पडत आहे. पाच ते सहा दिवसांनंतर नळ सोडण्यात येत असल्याने लहान मुलापासून तर वृद्ध, स्त्री, पुरुष पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. काही गावकरी दोघा-तिघांमिळून टॅँकरने पाणी विकत घेत आहेत. राजनी, बोरगाव, उमरी, बोटोणा, किन्हाळा, एकार्जुन, खरसखांडा, गवंडी, भालेवाडी येथे भीषण पाणी समस्येने उग्ररूप धारण केले आहे. एप्रिल, मे महिन्यात यापेक्षाही भयानक स्थिती असेल, असे संकेत आहेत. टंचाईमुळे नागरिकांसोबतच जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील एकमेव खैरी धरण कोरडे होण्याच्या मार्गावर आहे. खैरी धरणावरील नारा अधिक २२ योजना पाणीसमस्येमुळे निरर्थक ठरली आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई