‘लोकमत’ने केला पाठपुरावा : अपघाताला बसणार आळावायगाव (नि.) : वर्धा-राळेगाव, चंद्रपूर-देवळी मार्ग, अमरावतीकडे जाणारा नजीकचा मार्ग हा वायगावच्या चौरस्त्यावरून जातो. या मार्गावर रात्रंदिवस अवजड वाहनांची वर्दळ असते. भरधाव वाहनांना चौरस्ता जवळ आल्यावर वेग कमी करण्यासाठी गतिरोधक गरजेचे होते. मागणी करूनही ते तयार केले जात नसल्याने अपघात होत होते. ‘लोकमत’ने पाठपुरावा केल्यानंतर गतिरोधक निर्माण करण्यात आल्याने अपघातावर नियंत्रण होणार आहे.या मुख्य मार्गावर गतिरोधक नसल्याने अपघात वाढले होते. चौरस्त्यावर अनेकांना जीव गमवावा लागला. काहींना कायम अपंगत्व पत्करावे लागले. याबाबत ‘लोकमत’ने पाठपुरावा केला. आ. रणजीत कांबळे, खा. रामदास तडस व बांधकाम अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला. यावरून प्रशासनाने दखल घेत वायगाव (नि.) चौरस्त्यावरील चारही बाजूने गतिरोधक तयार करण्यासच्या कामाला सुरूवात केली आहे. या चौरस्त्यावर गतिरोधकाची निर्मिती करण्यात आल्याने अपघातांवर आळा घालणे शक्य होणार आहे.(वार्ताहर)
अखेर धोकादायक चौकात गतिरोधकाची निर्मिती
By admin | Updated: October 26, 2016 01:01 IST