शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

गौरी विसर्जनासाठी गेलेल्या दोन महिला व दोन मुलांना जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 16:26 IST

हिंगणघाट येथील वणा नदीच्या काठावर गौरी विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन महिलांसह दोन मुले बुडाल्याची घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: हिंगणघाट येथील वणा नदीच्या काठावर गौरी विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन महिलांसह दोन मुले बुडाल्याची घटना सोमवारी दुपारी  दोनच्या सुमारास  घडली.येथील कवडघाट येथे सकाळी काही महिला गौरी विसर्जन करण्यासाठी गेल्या होत्या. त्यात रिया भगत (३५) ही महिला पण होती. त्यांचा मुलगा अभि (१०) व मुलगी अंजना (१३) हेही सोबत होते. नदीपात्रात उतरलेल्या आईसोबत अभिही गेला होता. त्यावेळी नदीच्या प्रवाहाला वेग असल्याने अभि नदीत वाहून जाऊ लागल्याचे दिसताच, त्याची बहिण अंजना त्याला वाचवण्यासाठी धावली. मात्र तीही पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत असल्याचे पाहून त्यांची आई रिया हिने धाव घेतली. या तिघांनाही वाहताना पाहून नदी काठावर असलेल्या दिपाली मारोती भटे या महिलेनेही नदीत उतरून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. नदीच्या पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने हे चारही जण प्रवाहासोबत वाहत गेले.नदीच्या पात्रात चार जण वाहून जात असल्याचे कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस रामदास चकोले यांनी नदी पात्रात उडी घेऊन रिया भगत यांना पाण्याबाहेर काढले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उर्वरित तिघांचे मृतदेह अद्याप हाती लागलेले नाहीत. त्यांच्या शोधासाठी एनडीआरएफच्या चमूला पाचारण केले आहे. आ. समीर कुणावर यांनी घटनास्थळी पोहचून प्रशासकीय यंत्रणेला तातडीने कारवाई करण्याचे निर्र्देश दिले आहेत.

टॅग्स :Deathमृत्यू