शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By admin | Updated: April 20, 2017 00:46 IST

हिंगणघाटकडून येणाऱ्या भरधाव ट्रेलरने दुचाकीला मागाहून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला

एक गंभीर जखमी : उड्डाण पुलावरील अपघात, वाहतुकीचा खोळंबा वर्धा : हिंगणघाटकडून येणाऱ्या भरधाव ट्रेलरने दुचाकीला मागाहून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना स्थानिक बजाज चौक भागातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपूलावर मंगळवारी रात्री उशीरा घडली. जखमीवर सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार सुरू असून सदर अपघातामुळे वर्धा-यवतमाळ, वर्धा-हिंगणघाट मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. रोहीत राजपाल मेश्राम (३३) रा. समतानगर असे मृतकाचे तर हेमंत प्रभुदास बुचुंडे (२८) असे गंभीर जखमीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक समतानगर येथील हेमंत बुचुंडे व रोहीत मेश्राम हे एम.एच.३२/झेड. ६६२३ क्रमांकाच्या दुचाकीने समतानगर येथून वर्धा शहरात येत होते. दुचाकी बजाज चौकातील उड्डाणपुलावर आली असता हिंगणघाटकडून येणाऱ्या अज्ञात ट्रेलरने त्यांच्या दुचाकीला मागून जबर धडक दिली. अपघात होताच ट्रेलर चालकाने घटनास्थळावरून वाहनासह यशस्वी पळ काढला. या अपघातात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत मिळेल त्या वाहनाचा उपयोग करीत जखमींना सावंगी (मेघे) येथील रुग्णालयाकडे रवाना केले. गंभीर जखमी रोहीत मेश्राम याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त दुचाकी ताब्यात घेत पंचनामा केला. या घटनेची जि.प.सदस्य उमेश जिंदे यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली असून तक्रारीवरून अज्ञात ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी ट्रेलर चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.(शहर प्रतिनिधी)